नंदुरबार : देशभरात घोडेबाजारासाठी प्रसिद्ध असलेला सारंगखेडा येथील घोडेबाजाराला आणि चेतक फेस्टिव्हलला ३ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. या संपूर्ण फेस्टिवलची तयारी पूर्ण झाली असून घोडे बाजारात जवळपास १५०० घोडे दाखल झालेत.
येत्या दोन दिवसात हा आकडा तीन हजाराच्या घरात जाईल अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केलीय. घोडे बाजारात देशभरातून येणा-या पर्यटकांसाटी चेतक व्हिलेज उभारण्यात आलंय. या ठिकाणी पर्यटकांना राहण्याची व्यवस्था करण्यात येत असून त्याचं काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिलीय.
नंदुरबारच्या सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवल अश्व शौकीनासाठी पर्वणी असते. यावर्षी अनेक नवीन स्पर्धा असणार आहेत. त्यासोबत विदेशी जातीच्या घोड्याचे प्रदर्शन देखील भरणार आहे.