Political Update: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला राहुल गांधींनी साधं फुलंही वाहिलं नाही? बावनकुळेंची टीका

Political Update: राजीव गांधींची (Rajiv Gandhi) जयंती पुण्यतिथीला उद्धव ठाकरे त्यांना आदरांजली वाहतात. मात्र आज माझा प्रश्न आहे की बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) स्मृतिदिनी राहुल गांधी यांनी त्यांच्या प्रतिमेला फुल वाहिली आहेत का? चार शब्द ते बोलले का?, उद्धव ठाकरेंनी संपूर्ण पक्ष काँग्रेसच्या वेठीस बांधला आहे.

Updated: Nov 17, 2022, 08:16 PM IST
Political Update: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला राहुल गांधींनी साधं फुलंही वाहिलं नाही? बावनकुळेंची टीका  title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर: देशाची मान राहुल गांधी (Rahul Gandhi on Swatantryaveer Savarkar) यांच्या वक्तव्याने खाली गेली आहे. सावरकरांबद्दल राहुल गांधी (Rahul Gandhi Bharat Jodo yatra) आक्षेपार्ह वक्तव्य करत आहे आणि काँग्रेस (Congress Party) पार्टी त्याचा समर्थन करत आहे. राहुल गांधी यांना सावरकरांचा इतिहास माहीत असूनही ते जाणून बुजून तो इतिहास (History) दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहे, चुकीचं वक्तव्य केल्यामुळे देशाला त्यांच्याबद्दल घृणा निर्माण झाली आहे, देश राहुल गांधी यांना माफ करणार नाही. राहुल गांधींनी या यात्रेतून जे काही एक-दोन टक्के समर्थन कमावलं होतं ते या वक्तव्याने गमावलं आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मांडली. (chandrashekhar bawankule critises rahul gandhi on using inappropriate words about swatantryaveer savarkar)

बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथीला राहूल गांधींनी फुलंही वाहिली नाहीत? 

राजीव गांधींची (Rajiv Gandhi) जयंती पुण्यतिथीला उद्धव ठाकरे त्यांना आदरांजली वाहतात. मात्र आज माझा प्रश्न आहे की बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) स्मृतिदिनी राहुल गांधी यांनी त्यांच्या प्रतिमेला फुल वाहिली आहेत का? चार शब्द ते बोलले का?, उद्धव ठाकरेंनी संपूर्ण पक्ष काँग्रेसच्या वेठीस बांधला आहे. ते काँग्रेसला समर्पित झाले आहेत. राहुल गांधींनी सावरकरांबद्दल चुकीचं वक्तव्य केल्यानंतर उद्धव ठाकरे गट राहुल गांधींच्या यात्रेचा बहिष्कार जाहीर करतील अशी आमची अपेक्षा होती मात्र आदित्य ठाकरेंना ते पाठवतात फक्त उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचा संविधान स्वीकारण्याएवढेच आता बाकी राहिले आहे, असेही ते पुढे म्हणाले. 

हेही वाचा - Maharashtra : राज्यात येथे सापडलाय सोन्याचा खजिना, यातून झाला मोठा उलगडा

राहूल यांच्यावर गुन्हा दाखल करा : 

देवेंद्र फडणवीस (Devendra Phadavis) असे कधीच बोलले नाही पण जर अन्यायाच्या विरोध आवाज उचलला तर काय चूक आहे?, यात्रा थांबवायची असती तर पहिल्या दिवशी थांबवली असती, आम्हाला त्याच्यात रस नाही. महाराष्ट्रात (Maharashtra) येऊन वीर सावरकर यांच्या विरोधात बोलणे आम्ही खपून घेणार नाही. राहुल गांधीना महाराष्ट्रात येण्याचा अधिकार राहिला नाही. राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा (rahul gandhi) दाखल केला पाहिजे, आमची मागणी आहे की त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा. 

हेही वाचा - पुण्याच्या तरूणीने स्वत:च्याच अपहरणाचा रचला डाव, कारण एकूण धक्काच बसेल

चित्रा वाघही बरसल्या : 

जे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा (Swatantryaveer Savarkar) अपमान करतात त्यांच्यासोबत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे कुटुंबीय कसे काय जाऊ शकतात. हा संपूर्ण महाराष्ट्राचा आणि देशाचा अपमान आहे. एका बाजूला सावरकरांसाठी भारतरत्नची (Bharat Ratna) मागणी करायची आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा सतत अपमान करणाऱ्या काँग्रेसचे (Congress) हात बळकट करण्याचे काम उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांची पक्ष करत आहे. संजय राठोडबद्दल (Sanjay Rathore) मी माझी भूमिका बदलेली नाही. संजय राठोड यांचा राजीनामा मागणार आहे. मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती दुर्दैवी आहे, मी माझी भूमिका बदलली नाही. मला अनेक जिल्ह्यात या संदर्भात प्रश्न विचारले जातात.