Marrige: नाद खुळा! हेलिकॉप्टर मधून निघाली नवरा नवरीची वरात; थाट पाहून वऱ्हाडी चाट पडले

असाच एक नाद खुळा लग्न सोहळा नंदुरबारमध्ये (Nandurbar) पहायला मिळाला आहे. जिथे वाहनही लगेच मिळत नाही अशा अतिदुर्गम भागात नवरा नवरीने लग्नसोहळ्यासाठी हेलिकॉप्टरने Entry केली. 

Updated: Feb 14, 2023, 11:02 PM IST
Marrige: नाद खुळा! हेलिकॉप्टर मधून निघाली नवरा नवरीची वरात; थाट पाहून वऱ्हाडी चाट पडले title=

प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार : लग्न सोहळा हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. आपलं लग्न थाटामाटात व्हाव अशी प्रत्येक जोडप्याची इच्छा असते.  लग्न सोहळा अविस्मरणीय करण्यासाठी सध्या हटके ट्रेंड पहायला मिळतात. म्हणतात ना हौसेला मोल नाही. म्हणूनच तर लाखो रुपये खर्च करुन अनेकजण डेस्टिनेशन वेडिंग करतात.  डेस्टिनेशन वेडिंग शक्य नसल्यास अनेकजण वेगवेगळ्या शक्कल लढवतात. असाच एक नाद खुळा लग्न सोहळा नंदुरबारमध्ये (Nandurbar) पहायला मिळाला आहे. जिथे वाहनही लगेच मिळत नाही अशा अतिदुर्गम भागात नवरा नवरीने लग्नसोहळ्यासाठी हेलिकॉप्टरने Entry केली (Bride and groom helicopter entry for wedding ceremony). नवरा नवरीचा थाट पाहून वऱ्हाडी चाट पडले. 

विवाह सोहळा आगळावेगळा आणि संस्मरणीय राहावा यासाठी नंदुरबारमध्ये एका वर पीत्याने चक्क वधू वराला हेलेकॉप्टरमधून   सफर घडवली. लग्न मंडपात थेट हेलीकॉप्टरमधुन नवरे आणि नवरदेव दाखल झाले आहेत. नंदुरबार सारख्या अतिदुर्गम भागात जिथे वाहनही मिळत नाही तेथे  हेलिकॉप्टर मधून वर आणि वधू दाखल झाल्याची घटना पहिल्यांदाच घडत असल्याने पाहणाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. 

नंदुरबारमध्ये फळ व्यापारी मोहिनीराज राजपूत यांचा मुलगा चि. हंसराज आणि चि.सौ.कां रितिका यांच्या आज विवाह सोहळा पार पडला. आपल्या मुलाच्या विवाहानिमित्ताने वधु वराच्या हवाई मिरवणुकीसाठी त्यांनी खास हेलीकॉप्टर सफारीचे आयोजन केले होते. नंदुरबार शहरातल्या जीटीपी महाविद्यालयाच्या मैदानावर हा शाही विवाह सोहळा पार पडला. हेलिकॉप्टर मधून निघालेली ही नवरा नवरीची मिरवणुक पाहण्यासाठी बघ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नंदुरबार हा विवाह सोहळा चर्चेचा विषय ठरला.