Cut practice : वैद्यकीय क्षेत्रातील कट प्रॅक्टिस बंद होणार; वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांचे मोठं विधान

वैद्यकीय क्षेत्रातील कट प्रॅक्टिस (Cut practice in the medical field) ही एक प्रकारे रुग्णांची लुटच आहे. हा प्रकार बंद झाल्यास रुग्णांना मोठा फायदा होईल. 

Updated: Feb 14, 2023, 06:41 PM IST
Cut practice : वैद्यकीय क्षेत्रातील कट प्रॅक्टिस बंद होणार; वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांचे मोठं विधान title=

विशाल करोळे, झी मीडिया, जळगाव : वैद्यकीय क्षेत्रासंबंधी मोठी बातमी समोर आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कट प्रॅक्टिस (Cut Practice In Medical Field) बंद करण्याची गरज आहे. त्याबाबत नव्यानं कायद्याची गरज आहे असं मोठं विधान वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन (Medical Education Minister Girish Mahajan) यांनी केले आहे. कट प्रॅक्टिस ही वैद्यकीय क्षेत्राला लागलेली कीड आहे असंही महाजन यांनी म्हटल आहे.  कट प्रॅक्टिसविरोधात लवकरच कायदा आणणार असल्याचं गिरीश महाजनांनी म्हटल आहे. 

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी वैद्यकीय क्षेत्रातील कट प्रॅक्टिस बाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. या कट प्रॅक्टिसची पाळंमुळं फार खोलवर रुजलेली आहेत.  वैद्यकीय क्षेत्राला लागलेली ही किड आहे,  ती मुळासकट उपटून फेकणे गरजेचं  असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणाले. 

या आधी 2017 मध्ये सुद्धा कायदा करण्याचे प्रयत्न झाले आहेत. महाराष्ट्र प्रिवेंशन कट प्रॅक्टिस ऍक्ट 2017 मध्ये होणार होता. त्यातील प्रस्तावित तरतुदीनुसार 50 हजार दंड, आणि पाच वर्षांची शिक्षा अथवा दोन्ही प्रकारच्या शिक्षा दोषी डॉक्टरांना होऊ शकते. 2017 मध्ये आय एम ए ने सुद्धा या कायद्याला विरोध केला होता. यातून डॉक्टरांना त्रास देण्यात येईल असं डॉक्टर संघटनेचे  म्हणणं होते.

कट प्रॅक्टिस म्हणजे काय आणि ती कशी देतात?

  • एखाद्या डॉक्टरने रुग्णाला पुढील उपचार किंवा चाचण्यासाठी दुसरा डॉक्टरकडे पाठवने आणि त्या मोबदल्यात त्या डॉक्टरने या डॉक्टरला पैसे देणे म्हणजे कट प्रॅक्टिस आहे. 
  • यात रुग्णाच्या एकूण खर्चावर काही टक्के वा आधीपासून ठरलेल्या टक्केवारी नुसार पैसे देणे असले प्रकार चालतात.
  • Cut प्रॅक्टिस इन Pathology अर्थात पाथॉलॉजी मध्ये कट हा प्रकार सर्वाधिक चालतो. यात डॉक्टरने विविध प्रकारच्या रक्त चाचणी अमुक लॅब मधून करा अशी चिट्ठी दिली तर त्या डॉक्टरला कट म्हणून  30 ते 40 टक्क्यांच्या आसपास पैसे दिले जातात.  तर हेच पैसे  सोनोग्राफी मध्ये  20 ते 40 टक्के, टेस्ट नुसार दिले जातात. तर एम आर आय, सिटी स्कॅन, एक्स रे यातही 20 ते 35 टक्क्यांपर्यंत कट आहे.
  • विविध ऑपरेशनसाठी सुद्धा कट प्रकार चालतो. छोटं ऑपरेशन असेल तर  20 टक्के, खूप मोठं असले तर 35 टक्के पर्यंत कमिशन हे ज्याने रुग्ण पाठवलं त्या डॉक्टला दिले जातात.
  • इतकच नाही तर रुग्णाला गरज नसेल आणि तरी दाखल व्हायला सांगितलं तर यात 50 टक्क्यांपर्यंत कट दिल्या जातो. रुग्ण  दवाखान्यात जितके दिवस राहतो त्या बिलावर  हा कट असतो.
  • औषध निर्माण कंपन्या सुद्धा हेच औषध रुग्णाला द्यावे म्हणून डॉक्टरांना प्रलोभन देतात. परदेशी टूर घडवून आणणे, हॉटेल मध्ये राहणे खाणे पिणे याची व्यवस्था करणे. महागडे गिफ्ट देणे असले खर्च डॉक्टर साठी करतात. हे सगळे व्यवहार खास करून रोखीने होतात.
  • भारतात 99 टक्के ठिकाणी कट असल्याचं डॉक्टर खाजगीत सांगतात.