होस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

आत्महत्या की घातपात?

Updated: Oct 5, 2018, 01:21 PM IST
होस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू  title=

जळगाव : आदिवासी होस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ही घटना घडल्याचं समोर येतंय. योगेश आजऱ्या पावरा असं मयत विद्यार्थ्याचं नाव आहे. 

पण ही दुर्घटना नेमकी घडली कशी? याबाबतीत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम दिसून येतोय. अजाणतेपणी ही घटना घडली? की ही आत्महत्या आहे? की कुणी जाणून बुजून घडवून आणलेला घातपात? याबाबत घटनास्थळी चर्चा सुरू आहे. 

दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. विद्यापीठामध्ये उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये तणावाचं वातावरण दिसून येतंय. वसतिगृह अधीक्षक जागेवर नसल्याने विद्यार्थी संतप्त झालेत.