बोफोर्स तोफ खरेदी प्रकरण पाठयपुस्तकात, काँग्रेसकडून धडा वगळण्याची मागणी

राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने नववीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रकाशित केलेल्या इतिहासाच्या पाठपुस्तकात तत्कालिन पंतप्रधानांबाबत बदनामीकारक मजकूर छापल्याचा आरोप होतोय. 

Updated: Jul 27, 2017, 06:56 PM IST
बोफोर्स तोफ खरेदी प्रकरण पाठयपुस्तकात, काँग्रेसकडून धडा वगळण्याची मागणी title=

नागपूर : राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने नववीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रकाशित केलेल्या इतिहासाच्या पाठपुस्तकात तत्कालिन पंतप्रधानांबाबत बदनामीकारक मजकूर छापल्याचा आरोप होतोय. 

१९८० च्या दशकात झालेल्या बोफोर्स तोफ खरेदी प्रकरणात राजीव गांधी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आलाय. हा वादग्रस्त मजकूर वगळण्याची मागणी काँग्रेसने केलीय.

हा वादग्रस्त मजकूर बिना-विलंब वगळण्याची मागणी करत या चुकीकरता राज्य पाठयपुस्तक निर्मिती मंडळाने माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करावा ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. 

दरम्यान या वादग्रस्त मजकुराबद्दल शिक्षण विभागाचे उप-संचालक अनिल पारधी यांना विचारले असता आपल्याला याबद्दल काहीही माहिती नसल्याचे ते म्हणाले. पाठयपुस्तक छापण्याची जवाबदारी बाल-भारती संस्थेची असल्याचे सांगत त्यांनी यावर बोलण्याचे टाळले आहे.