वर्धा : MP Ramdas Tadas Controversy : जिल्ह्यात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. भाजप खासदार सूनेला मारहाण करत असल्याच्या आरोपानंतर ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. सकाळी मारहाणीचा गंभीर आरोप आणि संध्याकाळी त्याच्याशीच लग्न, असा प्रकार घडलाय.
भाजप खासदार रामदास तडस यांचे नाव मंगळवारी एकदम चर्चेत आले. त्यानंतर संध्याकाळी नाट्यमरित्या चर्चेला पूर्णविरामही देण्यात आला. चर्चा होण्यामागचे कारण म्हणजे त्यांच्या सूनेचा प्रसिद्ध झालेला एक व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये त्यांच्या सूनेने आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडे जाहीर मदत मागितली होती.
वर्ध्यातील भाजप खासदार रामदास तडस सूनेला मारहाण करत असल्याच्या आरोपानंतर मोठा ट्विस्ट । मुलगा पंकज तडस याचा आदर्श वैदिक विवाह मंगल कार्यालय येथे अखेर पार पडला विवाह सोहळा #Marriage #RamdasTadas pic.twitter.com/3Xktijsfd4
— ZEE २४ तास (@zee24taasnews) September 9, 2021
रुपाली चाकणकर यांनी हा व्हिडिओ आपल्या अकाऊंटवरुन ट्विट केला. यावेळी त्यांनी म्हटले होते, रामदास तडस आणि कुटुंबाकडून मारहाण होत आहे. तिच्यावर अत्याचार होत असल्याचा आरोप केला होता. यामुळे राजकारण चांगलेच तापले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा होती. मात्र, ही चर्चा एकदम संध्याकाळी थांबली. त्याचे कारणही तसेच आहे, संध्याकाळी या प्रकरणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला.
सकाळी आरोप करणाऱ्या पूजाने संध्याकाळी खासदार तडस यांचा मुलगा पंकज तडस यांच्याशी लग्न केले आणि वादावर पडदा टाकला. पंकज आणि पूजा यांचे वैदिक पद्धतीने लग्न पार पडले. पंकज तडस आणि पूजाच्या या लग्नासोसबत वादावर पडदा पडल्याचे सांगण्यात आले. दोघांचे याआधी रजिस्टर पद्धतीने लग्न झाले होते. पूजाच्या व्हिडिओनंतर निर्माण झालेल्या वादानंतर घरातच पूजा आणि तडसचे लग्न लागले.
वर्धा भाजप खासदार रामदास तडस यांच्या सुन यांना गेली अनेक दिवस हे तडस कुटूंब मारहाण करून अत्याचार करीत आहेत.पुजाचा आताच हा व्हिडीओ माझ्यापर्यंत आला, तातडीने पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला आहे. माझ्या पदाधिकारी व पोलिस सरंक्षणासाठी पोहचले आहेत. @NagpurPolice@maharashtra_hmo pic.twitter.com/PHAxlD2X3F
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) September 8, 2021