नागपूर : जिल्ह्यातील बुटीबोरीं वनपरिक्षेत्रातील आमघाटच्या जंगलात वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाला आहे.वनप्राण्याच्या संघर्षात वाघाच्या या बछड्याचा मृत्यू झाल्याचा आंदाज व्यक्त करण्यात येत आहे.हा बछडा सुमारे 10 ते 12 महिन्यांचा होता.मंगळवारी सायंकाळी वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
वाघाच्या बछडा मृत अवस्थेत मंगळवारी सायंकाळी गुराख्याला आमघाट जंगलामध्ये दिसून आला.आमघाट उपवनक्षेत्राचे क्षेत्रसहाय्यक जनवार यांना माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत. यावेळी उमरेड साह्यक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.वाघाचा बछडा कुजेलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या वाघाच्या बछड्याचा मृत्यू 8 ते 10 दिवसांपूर्वीच झाल्याचा संशय आहे.आमघाट येथील घटनास्थळ जंगल परिसराची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान कॅमेरा ट्रॅप तपासण्यात आले. सदर परिसरात नर वाघ, वाघीण दोन बछड्यांसह एकत्र फिरत असल्याचे दिसून आले.
मृत वाघाच्या बछड्याचे सर्व अवयव शाबूत आहेत.पण वाघाच्या बछड्याची मानेचे हाड तुटल्याचे पशुवैद्याकिय अधिका-यांनी केलेल्या शवविच्छेदनात दिसून आले.वन्यप्राण्याच्या संघर्षात या बछड्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे प्रकरणात शवविच्छेदन NTCA च्या एसओपी नुसार तीन पशुवैद्यकिय अधिकारी यांनी केले. डॉ. बिलाल सैय्यद, डॉ. खान व डॉ. समर्थ यांनी शवविच्छेदन केले असून लिंग परिक्षण व इतर विष परिक्षणाकरिता नमुने घेऊन प्रादेशिक फॉरेन्सीक नागपूरच्या प्रयोगशाळा येथे पाठवण्यात आले आहे.