MLA Jaykumar Gore car accident : भाजप आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gor) यांच्या गाडीला भीषण अपघात (car accident) झाला. पुणे-पंढरपूर रस्त्यावरील मलठण येथील स्मशानभूमीजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं त्यांची गाडी 30 फूट खोल खड्डयात पडली.
या दुर्घटनेत जयकुमार गोरे यांच्यासह चौघे जखमी झालेत. गोरे यांना किरकोळ दुखापत झाली असून दोघे गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी बारामतीला हलवण्यात आलंय. पुण्याहून गावी दहिवडीकडे जात असताना हा अपघात झाला. कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने पहाटे 3 वाजून 30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
आमदार जयकुमार गोरे हे या अपघातात जखमी झाले असून त्यांना आधी पुणे येथील रुबी या खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले. गाडीमधील त्याचा अंगरक्षक, गाडीचा चालक गंभीर जखमी असून त्याला देखील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पुण्याहून गावी दहिवडीकडे जात असताना हा अपघात झाला आहे.
जयकुमार गोरे (Jaykumar Gore) हे माणचे आमदार आहेत. विधानसभेच्या सलग तीन पंचवार्षिक निवडणुकीत निवडून येऊन आमदार जयकुमार गोरे यांनी माणमधील भक्कम मानल्या जाणाऱ्या राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवले. 2009 मध्ये अपक्ष, 2014 मध्ये काँग्रेस तर 2019 च्या निवडणुकीत भाजपमधून विजयी होऊन गोरे यांनी यशाची हॅट्ट्रिक साधली.
माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या आमदार गोरेंची नुकतेच भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड करुन राजकीय ताकद देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
ज्यावेळी शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधातच बंड करुन आपला वेगळा गट तयार केला. तब्बल चाळीसहून अधिक आमदार आपल्याकडे असल्याचा दावा करत शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजप बरोबर सत्ता स्थापन करावी, अशी या बंडखोर आमदार गटाची मागणी आहे, असे त्यांनी विधान केले होते. याच पार्श्वभूमीवर माणचे आमदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी खासगी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देऊन सत्तांतराची गणिते जुळतील असे म्हटले होते. तसेच भाजपाचे सरकार पुन्हा सत्तेवर येईल असे सूतोवाच केले होते आणि फडणवीस हे लवकरच मुख्यमंत्री होतील, असा विश्वासही गोरे यांनी व्यक्त केला होता. आता फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत.