MLA Ravi Rana: ठाकरेंविरुद्ध आक्रमक भूमिका घेणारे बडनेराचे आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांना मोबाईलवरून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी आमदार रवी राणा यांचे खासगी सचिव विनोद गुहे यांनी फिर्याद दिली आहे. राजापेठ पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळतंय. (Badnera MLA Ravi Rana has received a death threat from his mobile phone amrawati marathi news)
पोलिसांना आलेल्या माहितीनुसार, मागील 8 ते 10 दिवसांपासून रवी राणा यांना मोबाईलवर धमक्या (death threat) येत असल्याची माहिती सचिव विनोद गुहे (Secretary Vinod Guhe) यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल एकही शब्द उच्चारला तर पिस्तुल आणि चाकूने ठार मारु, अशी धमकी देण्यात आली होती.
आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या मोबाईलवर एका क्रमांकावरून फोन येत आहेत. हिवाळी अधिवेशनापूर्वी (Winter sessions) ज्यावेळी रवी राणा अमरावतीमध्ये होते. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने धमक्या दिल्या आहेत. रवी राणा यांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीची चौकशी करून त्याला अटक (Arrest) करावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल्यानंतर (Complaint lodged at Rajapeth Police Station) पोलीसांनी चौकशीस सुरूवात केली आहे. दक्षतेचा उपाय म्हणून ते ही तक्रार म्हणून तक्रार दाखल केल्याची माहिती सचिव गुहे यांनी यावेळी दिली आहे. त्यानंतर आता पोलीस या प्रकरणात कसून तपास करत असल्याचं दिसतंय.