मग उद्धव ठाकरेंना पंढरपुरातील एकादशीच्या महापूजेचा मान का दयावा, गोपीचंद पडळकरांचा सवाल

गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत.  

Updated: Jun 24, 2020, 12:21 PM IST
मग उद्धव ठाकरेंना पंढरपुरातील एकादशीच्या महापूजेचा मान का दयावा, गोपीचंद पडळकरांचा सवाल title=

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरातील महापूजेचा मान हा मुख्यमंत्र्यांचा  असतो. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीची महापूजा करू नये. असं वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. नुकताच झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपलं मत मांडलं आहे. सध्या कोरोना संसर्ग असल्याने पंढरपुरात जर बाहेरील लोक, महाराज मंडळीना प्रवेश नसेल तर आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करू नये. सामान्य शेतकरी कुटुंबातील वारकरी कुटूंबास महापूजेचा मान द्यावा. असं ते म्हणाले आहे. 

त्याचप्रमाणे, गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत.  शरद पवार नाशिकला अवकाळी पाऊस झाल्यानंतर गेले. कोकणात वादळानंतर गेले. पण अद्याप नुकसानग्रस्तांना मदत मिळाली नसल्याचं देखील ते यावेळेस म्हणाले. 

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची धनगर समाजाचा आक्रमक चेहरा आणि प्रभावशाली वक्तृत्व असलेला नेता म्हणून देखील ओळख आहे. तेव्हा धनगर समाजाला फडणवीस सरकारने तरतूद केलेले एक हजार कोटी सुध्दा महाविकास आघाडी सरकार ने दिले नसल्याचा प्रश्न पडळकर यांनी उपस्थित केला.