MPSC नाही झालात तरी... भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला

MPSC नाही झालात तरी गावाकडे सरपंचाची पोस्ट तुमची वाट पाहतेय असं सांगत भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अजब सल्ला दिला. यावेळी MPSCपेक्षा राजकारणात मोठी स्पर्धा आहे. असं सांगत त्यांनी या विद्यार्थ्यांना सरपंचपदापासून तुम्ही आमदार, खासदारकी पर्यंतचा प्रवास करू शकता असा अजब सल्लाही दिला. 

Updated: Dec 1, 2022, 05:23 PM IST
MPSC नाही झालात तरी... भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला title=

Maharashtra Politics: . पुण्यात MPSC विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याने राज्यात गदारोळ मजला असताना आता याच कार्यक्रमात भाजप आमदार गोपीचंद पडळकर(BJP MLA Gopichand Padalkar) यांनी केलेले वक्तव्य देखील चर्चेत आले आहे. MPSC  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना  गोपीचंद पडळकर यांनी अजब सल्ला दिला आहे. 

पुण्यात वास्तव कट्टा आणि अर्हम फाऊंडेशनच्यावतीने स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सदाभाऊ खोत, आमदार बच्चू कडू, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार निरंजन डावखरे आणि आमदार अभिमन्यू पवार उपस्थित होते. 

MPSC नाही झालात तरी गावाकडे सरपंचाची पोस्ट तुमची वाट पाहतेय असं सांगत भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अजब सल्ला दिला. यावेळी MPSCपेक्षा राजकारणात मोठी स्पर्धा आहे. असं सांगत त्यांनी या विद्यार्थ्यांना सरपंचपदापासून तुम्ही आमदार, खासदारकी पर्यंतचा प्रवास करू शकता असा अजब सल्लाही दिला. 

सदाभाऊ खोत यांचे वादग्रस्त वक्तव्य

याच कार्यक्रमात सदाभाऊ खोत यांनी देखील वादग्रस्त वक्तव्य केले.  राज्यकर्ते म्हणजे रेड्यांची औलाद आहेत. पाठीवर हात ठेवल्याशिवाय रेडे वेद बोलत नाहीत त्याचप्रमाणे राज्यकर्तेही बोलत नाहीत.  जिकडे जास्त डोकी तिकडेच राज्यकर्ते बोलतात, आणि तिथं नको ते बोलून जातात असं म्हणत सदाभाऊंनी राज्यकर्त्यांवर निशाणा साधला. 
 सरकार कोणाचंही असलं तरी भ्रष्टाचार होतो अभ्यास करणारा विद्यार्थी मागे रहातो, आणि पैसे देणारा विद्यार्थी पुढे जातो, बेरोजगारी हा विषय सरकारच्या अजेंड्यावर असला पाहिजे. आपण सर्वांनी मिळून भ्रष्टाचार कसा संपेल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही सदाभाऊ म्हणाले. आपण केलेलं विधान फार मोठं नाही, मी बोलताना मला काही शंका आली नाही, ज्यांच्या मनात शंका येऊ शकते त्यांच्याच मनाला हा शब्द लागू शकतो, असं स्पष्टीकरण सदाभाऊ खोत यांनी दिले.