अभिजीत बिचुकलेची मोठी घोषणा; राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उतरणार

बिग बॉस फेम अभिजीत बिचूकले (Abhijeet Bichukale) राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत उतरणार असल्याचे सांगितले जात आहे. 

Updated: Jun 17, 2022, 01:00 PM IST
 अभिजीत बिचुकलेची मोठी घोषणा; राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उतरणार title=

मुंबई : देशात राष्ट्रपती निवडणुकीची तयारी सुरु आहे. विरोधी पक्ष नेत्याकडून सर्व पक्षाचा मिळून एकचं उमेदवार देण्याची तयारी सुरु आहे, तर भाजप आपला वेगळा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे.त्यामुळे या  निवडणूकीत कॉंटे की लढत पाहायला मिळणार आहे. 

राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) यांचे नाव चर्चेत होते. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta banerjee) यांनी बोलावलेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीत शरद पवार यांनी ही निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे त्यांचे नावाव्यतिरक्त आता दुसऱ्या नावांवर चर्चा सुरु आहे. 

शरद पवारानंतर आता महाराष्ट्रातून राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी आणखी एका उमेदवाराचे नाव चर्चेत आले आहे. बिग बॉस फेम अभिजीत बिचूकले (Abhijeet Bichukale) राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत उतरणार असल्याचे सांगितले जात आहे. आपण राष्ट्रपती पदासाठी इच्छुक आहोत आणि काही आमदार-खासदारांशी संपर्कात आहोत, असं  अभिजीत बिचुकले यांनी सांगितले आहे. 

राष्ट्रपती निवडणुकीसाठी त्यांना विचारले असता अभिजीत बिचुकले  (Abhijeet Bichukale) म्हणाले,"हे सत्य आहे. मी सध्या पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या काही आमदार- खासदारांशी सह्यांसंदर्भात संपर्कात आहे. मी बहुजन समाजातला आहे, निर्व्यसनी, सुशिक्षित आणि कायद्याची माहिती असणारा आहे, हे मी मागच्या वेळीच मोदींना सांगितलं होतं. मात्र त्यांनी कोणीतरी कोविंद साहेब शोधून आणले आणि त्यांनी राष्ट्रपती केलं. बहुमत असल्यामुळं त्यांना ते जमलं"

बिचुकले (Abhijeet Bichukale)  पुढे म्हणाले की, न्यायपालिका, केंद्रातले निर्णय यांची सगळी ताकद राष्ट्रपतीच्या दबावाखाली असते. राष्ट्रपतींनी देशासाठी बरंच काही करायचं असतं. पण ते करत नाहीत. म्हणूनच आता मी देशातल्या आमदार खासदारांशी बोलतोय. सांगली, कोल्हापूर, पुण्यातल्या खासदारांशी चर्चा सुरू आहे. अर्जावर अनुमोदन करण्याची संख्या मिळाली तर माझा अर्ज १०० टक्के जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

दरम्यान आता अभिजीत बिचूकले यांना कोणते आमदार पाठींबा देतात. आणि बिचूकले राष्ट्रपती पदाच्या निवडणूक लढवतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.