नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार; काही ठिकाणी ढगफुटीसदृश पावसाने दाणादाण

सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात पांगरी शिवारात ढगफुटीसदृश पाऊस झाला. यावेळेत सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. 

Updated: Jun 29, 2022, 08:19 AM IST
नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार; काही ठिकाणी ढगफुटीसदृश पावसाने दाणादाण title=
छाया सौजन्य : सोशल मीडिया

नाशिक : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात पांगरी शिवारात ढगफुटीसदृश पाऊस झाला. यावेळेत सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. ((पांगरी शिवारात अभंग मळा, पांगरी-पंचाळे शिवारातील जाधव मळा, पांगरी-मिठसागरे शिव या भागात मुसळधार पाऊस सुरू झाला.)) अवघ्या अर्ध्या तासात या भागातील नद्या नाले दुथडी भरुन वाहू लागले.. या पावसामुळे जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. 

पांगरी शिवारातील गणपत अभंग यांच्या शेतातील आणि बंधा-यातील पाणी विहिरीचा कथडा तोडून विहिरीत शिरले... आणि अवघ्या काही मिनिटांत कोरडी विहिरी तुडुंब भरुन गेली.. दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या इगतपुरी तालुक्यातील बहुतांश भागाला दमदार पावसाने चांगलेच झोडपले. घोटी परिसरासह ग्रामीण भाग तसंच पूर्व भागातही या पावसाने जोरदार हजेरी लावली.

शिर्डी

शिर्डीमध्ये मुसळधार पाऊस झाला. या पावसाच्या तडाख्यामुळं शहरातील व्यापारी संकुलात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं. अनेक दुकांनात पाणी शिरल्यानं व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तसंच पालिकेने वेळीच नालेसफाई न केल्यानं व्यावसायिकांना याचा फटका बसला. यावर प्रशासन काहीही तोडगा काढत नसल्यानं व्यावसायिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

सातारा

साता-यात महाबळेश्वर प्रतापगड भागात मुसळधार पाऊस झाला. या पहिल्याच पावसात, चतुरबेट इथला कोयना नदीवरचा पूल वाहून गेला. यामुळे काही गावांचा संपर्क तुटला. गेल्या वर्षी जुलै महिन्यात अतिवृष्टीत या भागातले रस्ते, पूल वाहून गेले होते. त्यानंतर प्रशासनानं तात्पुरत्या स्वरूपात हे रस्ते आणि पूल दुरुस्त केले होते. मात्र पहिल्याच पावसात पूल वाहून गेला.