पुण्यातील सारथी संस्थेतील भूमिपूजनाचे काम मराठा क्रांती मोर्चाने रोखले

Maratha Kranti Morcha : शहरातील सारथी संस्था इमारत भूमिपूजनाचे काम मराठा क्रांती मोर्चाने बंद पाडले. 

Updated: Mar 16, 2022, 03:16 PM IST
पुण्यातील सारथी संस्थेतील भूमिपूजनाचे काम मराठा क्रांती मोर्चाने रोखले title=

पुणे :  Maratha Kranti Morcha : शहरातील सारथी संस्था इमारत भूमिपूजनाचे काम मराठा क्रांती मोर्चाने बंद पाडले. छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने सुरू असलेल्या सारथी संस्थेत पूजाअर्चा सुरु असल्याने मराठा क्रांती मोर्चाने जाहीर विरोध केला आहे. धार्मिक पूजेला आक्षेप घेत भूमिपूजनाचे काम बंद पाडले. (Bhumi Pujan program at Sarathi Sanstha in Pune was stopped by Maratha Kranti Morcha)

पुण्यातील सारथी संस्थेतील भूमिपूजनाचे काम मराठा क्रांती मोर्चानं बंद पाडल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने सुरू असलेल्या सारथी संस्थेत भूमिपुजनावेळी धार्मिक पूजाअर्चा सुरू होती. या पुजेला मराठा क्रांती मोर्चाने आक्षेप घेतला. छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराला सारथीच्या अध्यक्षांकडून तिलांजली देण्याचे काम केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला. यावेळी मराठा क्रांती मोर्चाने विरोध करत भूमिपूजनाचं काम बंद पाडले.

छत्रपती शाहू महाराज यांच्यानावाने सुरू झालेली सारथी संस्थेत आज जी नव्या प्रशासकीय इमारत बांधण्यात आली होती. त्या नव्या इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सारथीच्या नव्या जागेत करण्यात आला होता. या भूमीपूजनात धार्मिक पूजाअर्चा करण्यात आली. याला मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आक्षेप घेण्यात आला.