मुंबई: केंद्र सरकारने ५९ चिनी 59 Chinese apps एप्लिकेशन्सवर बंदी घातल्यानंतर आता काँग्रेसने NaMo App ही बंद करा, अशी मागणी केली आहे. भारतीयांची खासगी माहिती धोक्यात असल्याचे सांगत केंद्र सरकारने 59 Chinese apps बंदी घातली. याच निकषावर वापरकर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खाजगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेर परदेशातील कंपन्यांना पाठवणारे NaMo अॅप देखील बंद केले पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. त्यामुळे आता भाजपचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
जाणून घ्या TikTok बंद पडल्याने चीनला किती कोटींचे नुकसान होणार?
भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने TikTok, Share It, Helo यासह ५९ Apps वर बंदी घातल्याचे सोमवारी जाहीर केले. आयटी अॅक्टच्या कलम 69 ए नुसार सरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून यावर बंदी घातल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. गलवान खोऱ्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारची ही कृती अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
१३० कोटी भारतीयांची खाजगी माहिती धोक्यात आहे म्हणून सरकारने ५९ मोबाईल अॅपवर बंदी घातली. याच निकषावर वापरकर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खाजगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेर परदेशातील कंपन्यांना पाठवणारे NaMo अॅप देखील बंद केले पाहिजे. #BanNaMoApp
— Prithviraj Chavan (@prithvrj) June 30, 2020
TikTok आणि Heloला आणखी एक झटका
दरम्यान, या सगळ्यानंतर मंगळवारी TikTok कडून आपली बाजू मांडण्यात आली. भारत सरकारनं जारी केलेल्या ५९ ऍप ब्लॉक करण्याच्या अंतरिम आदेशामध्ये टिक टॉकचाही समावेश आहे. आम्ही या आदेशाचं पालन करत आहोत. सदर प्रकरणी आम्हाला सरकारी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीचं बोलावणं आलं आहे. संरक्षित बाबी आणि डेटा प्रायव्हसीबाबतच्या सर्व अधिनियमांचं टिक टॉकनं पालन केलं असून आमच्याकडून कोणत्याही प्रकारची माहिती परदेशी आणि चिनी सरकारला देण्यात आलेली नाही. भविष्यातही असं केलं जाणार नाही. ऍपच्या वापरकर्त्यांची गोपनीयता आणि अखंडता यालाच आम्ही प्राधान्य देत असल्याचे TikTok चे भारतातील प्रमुख निखिल गांधी यांनी सांगितले.