शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंची धुलाई

औरंगाबाद जिल्ह्यातील शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या  रोडरोमिओला गावकऱ्यांनी बेदम चोप दिला. 

Updated: Feb 29, 2020, 08:04 PM IST
शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंची धुलाई title=
संग्रहित छाया

औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यतल्या वसुसायगांवमध्ये एका शाळकरी मुलीची रोडरोमिओनं छेड काढली. त्या रोडरोमिओला पकडून गावकऱ्यांनी बेदम चोप दिला. त्यानंतर या रोडरोमिओला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

वसुसायगांव येथील तुळजाभवानी येथे दहावीत शिकणाऱ्या मुलींची हा रोडरोमिओ छेड काढायचा. शाळा सुटल्यावर तो मुलींना गाठायचा. शाळा सुटल्यानंतर तीन किलोमीटरवर असलेल्या खडकनाराळा इथे घरी जात असताना काही तरुणांनी मुलींची छेड काढली. हीबाब काही ग्रामस्थांच्या कानी आली. त्यानंतर या रोडरोमिओंचा शोध घेत त्यांची चांगलीच धुलाई करण्यात आली. या तरुणाला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.