Assembly Election 2024: विधानसभा निवडणुक मतदानासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाने जाहीरनामे जाहीर केले आहेत. बुधवारी काँग्रेसने वचननामा जाहीर देत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. तर, आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानेदेखील वचननामा जाहीर केला आहे. मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वचननाम्याचे अनावरण झाले आहे. तर, लवकरच जाहीरनामादेखील जाहीर केला जाणार आहे.
उद्धव ठाकरे गटाच्या वचननाम्यात अनेक मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यामांशी संवाद साधला होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आम्ही काय करणार आहोत याचा तपशील नमूद केला आहे. त्यात जनतेची सेवा कशी करायची याचा उल्लेख केला आहे. तसंच, वचननाम्यावर क्युआर कोड देण्यात आला आहे. क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर संपूर्ण वचननामा वाचता येणार आहे.
- संस्कार
प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य, देखणे आणि प्रेरणादायी मंदिर उभारणार.
-अन्नसुरक्षा
शेतकऱ्यांचे नुकसान होवू न देता गहू, तांदूळ, डाळ, तेल आणि साखर ५ जीवनावश्यक वस्तूंचे भाव ५ वर्षे स्थिर ठेवणार.
-महिला
महिलांना मिळणारे सरकारी अर्थसहाय्य वाढवणार,
प्रत्येक पोलीस स्टेशन बरोबरीने स्वतंत्र २४४७ महिला पोलीस ठाणे सुरु करणार. अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांच्या वेतनात वाढ करणार
-आरोग्य
प्रत्येक कुटुंबाला २५ लाखांपर्यंतची कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट उपलब्ध करून देणार.
-शिक्षण
जात-पात-धर्म-पंथ न पहाता, महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला मुलींप्रमाणे मोफत शिक्षण देणार.
-पेन्शन
सरकारी कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार.
-शेतकरी
'विकेल ते पिकेल' धोरणानुसार बळीराजाच्या पीकाला हमखास भाव मिळवून देणार.
-वंचित समूह
वंचित समूहांच्या हक्कांच्या रक्षणासाठी महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करणार.
-मुंबई
धारावीकरांना त्यांच्या उद्योगांच्या सोयींसह राहतं घर तिथल्या तिथे देणार. मुंबईतील आणि महाराष्ट्रातील भूमीपुत्रांच्या रोजगारासाठी जागतिक दर्जाचे आर्थिक व औद्योगिक केंद्र उभारणार.
-उद्योग
बारसू येथील रिफायनरी प्रकल्प रद्द करणार, निसर्ग उध्वस्त करणाऱ्या विनाशकारी प्रकल्पांना परवानगी न देता पर्यावरणस्नेही उद्योगांना प्रोत्साहन देणार.