Rasha Thadani Childhood pic with Salman Khan : गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक यंदाच्या वर्षी येणाऱ्या चित्रपटांसाठी उत्सुक आहे. त्यापैकी एक चित्रपट हा लेक राशा थडानीचा आहे. राशा थडानी ही लवकरच 'आजाद' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यानं सगळ्यांना वेड लावलं आहे. राशाच्या 'उई अम्मा' या गाण्यानं सगळ्यांना भुरळ पाडली आहे. तर सलमान खानच्या बिग बॉस या शोमध्ये तिनं हजेरी लावली होती. त्यावेळी राशा ही तिचा सहकलाकार अमन देवगणसोबत पोहोचली होती. त्यानंतर राशानं सलमान खानसोबत असलेल्या तिच्या बालपणीचे काही फोटो शेअर केले आहेत.
राशा ही सध्या तिच्या 'आजाद' या चित्रपटाटं प्रमोशन करण्यासाठी अमन देवगनसोबत 'बिग बॉस' च्या स्टेजवर दिसली होती. राशा थडानीनं 'बिग बॉस 18' च्या वीकेंड के वार आणि त्यासोबत लहाणपणीचे फोटो शेअर केले आहेत. त्यात ती सलमान खानसोबत दिसत आहे. राशानं हे फोटो शेअर करत लिहिलं की 'फुल सर्कल मोमेंट'. राशानं सलमान खानसोबत पोज देत फोटो काढले.
राशानं शेअर केलेल्या फोटोंवर नेटकरी विविध कमेंट करत आहेत. एक नेटकरी म्हणाला, असं वाटतंय की 'आलिया भट्टनंतर जर कोणी स्टारकिड बॉलिवूजवर राज्य करेल तर ती राशा थडानी असेल. ती खूप विनम्र आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, '2025 ची पहिली अभिनेत्री आहे जी इतकी सुंदर आहे आणि क्यूट पण. तिची चाहती झाली.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'आईनंतर लेकीनं एन्ट्री केलीय आणि भाईजान जसाच्या तसा आहे.'
'बिग बॉस' च्या सेटवर खूप मज्जा-मस्ती केली. सलमाननं यावेळी राशासोबत काही जुने किस्से शेअर केले आहे. सलमाननं राशा आणि अमनला पाहून सांगितलं की विश्वास करणं देखील कठीण आहे की तुम्ही हीरो आणि हीरोइन झाले आणि मी जिथे होतो तिथेच आहे. यावेळी राशा, अमनसोबत रवीना टंडन देखील 'बिग बॉस'च्या स्टुडिओमध्ये दिसली. या सगळ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.