वयाच्या 16 व्या वर्षी मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या प्रेमात; लग्नानंतर सोडली इंडस्ट्री अन् 10 वर्षानंतर घेतला मोठा निर्णय

Actress Was in Love With CM's Son at the Age of 16 : वयाच्या 16 व्या वर्षी ही अभिनेत्री होती मुख्यमंत्र्याच्या मुलाच्या प्रेमात; लग्नानंतर सोडली इंडस्ट्री पण 10 वर्षानं...

दिक्षा पाटील | Updated: Jan 14, 2025, 12:46 PM IST
वयाच्या 16 व्या वर्षी मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या प्रेमात; लग्नानंतर सोडली इंडस्ट्री अन् 10 वर्षानंतर घेतला मोठा निर्णय title=
(Photo Credit : Social Media)

Actress Was in Love With CM's Son at the Age of 16 : लोकप्रिय अभिनेत्री वयाच्या 16 व्या वर्षी मुख्यमंत्रीच्या मंत्र्याच्या प्रेमात होती. करिअरच्या शिखरावर असताना त्यांनी चित्रपटसृष्टी सोडली आणि मुख्यमंत्र्याची सून झाली. तर आज तिच अभिनेत्री ही राजकारणी कुटुंबाचा एक भाग आहे. तिच्या लग्नाला 12 वर्ष झाली असून त्यांनी एक निर्णय घेतला आहे. अमिताभ बच्चनसोबत पार्कर पॅनच्या जाहिरातीमुळे तिला लोकप्रियता मिळाली होती आणि तिला 16 वर्षांचा असताना पार्टनर देखील मिळाला होता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही कोणती अभिनेत्री आहे. तर ती दुसरी कोणी नसून जिनिलिया डिसूजा आहे. 

जिनिलिया डिसूजानं वयाच्या 16 व्या वर्षी रितेश देशमुख यांच्यासोबत 'तुझे मेरी कसम' मध्ये काम केलं. जिनिलियाला वाटलं होतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा असल्यानं रितेश खूप जास्त गर्विष्ठ असेल. पण रितेश त्याच्या अगदी उलट होता. याच चित्रपटाच्या सेटवर रितेश आणि जिनिलियाचं एकमेकांवर प्रेम झालं. ते जवळपास 9 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. जिनिलिया लग्नानंतर अभिनय क्षेत्रापासून दूर झाली. या 10 वर्षाच्या काळात तिनं तिच्या कुटुंबाला आणि मुलांना सगळा वेळ दिला. चित्रपटापासून दूर असलेल्या जिनिलियानं 10 वर्षांनंतर रितेशसोबत चित्रपटसृष्टीत पुन्हा कमबॅक केलं. लग्नाच्या 10 वर्षानंतर तिनं पुन्हा एकदा इंडस्ट्रीमध्ये कमबॅक केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

मात्र, असं असलं तरी कोणताही अवॉर्ड शो असो किंवा कोणता कार्यक्रम ते दोघं सोबतच सगळीकडे जायचे. त्याशिवाय इंटरनेटवर त्याचे मजेशीर रील्स देखील शेअर करत होते. त्यांचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल व्हायचे. जिनिलिया आणि रितेश या दोघांकडे पाहून त्यांचे चाहते नेहमीच बोलतात की त्यांच्यातलं प्रेम हे कमी झालेलं नाही. त्यांच्यात असलेलं प्रेम पाहून अनेकांना आश्चर्य होतं. जशी सुरुवात खास होती त्या प्रमाणे या जोडप्याची एक वेगळी फॅन फॉलोइंग आहे. जिनिलिया आणि रितेश यांची जोडी ही फार रोमॅन्टिक आहे. 

हेही वाचा : 'तारे जमीन पर' फालतू चित्रपट!' युवराज सिंगचे वडील म्हणाले, 'असे चित्रपट पाहत नाही कारण...'

रितेश आणि जिनिलिया हे नेहमीच इतरांचा विचार करताना दिसतात. त्या दोघांनी मृत्यूनंतर अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. रितेश देशमुखनं अंगदान करण्याविषयी सांगितलं होतं की आमच्याकडे दुसऱ्या कोणाला जीनव देण्यापेक्षा दुसरं काही चांगलं काम नाही.