अलिबागच्या शेतकऱ्यांना उधाणाच्या पाण्याचा फटका, खारे पाणी शेतात

इथल्‍या हजारो एकर जमिनीचे संरक्षण करण्‍यासाठी असलेली बांधबंदिस्‍ती उधाणाच्‍या पाण्‍याने फुटून खारे पाणी शेतात घुसते.

Updated: Jan 12, 2018, 12:46 PM IST
 अलिबागच्या शेतकऱ्यांना उधाणाच्या पाण्याचा फटका, खारे पाणी शेतात  title=

अलिबाग : अलिबाग तालुक्‍यातील खारेपाट भागातील शेतकऱ्यांना उधाणाच्‍या पाण्‍याचा फटका नेहमीच बसत आलाय.

इथल्‍या हजारो एकर जमिनीचे संरक्षण करण्‍यासाठी असलेली बांधबंदिस्‍ती उधाणाच्‍या पाण्‍याने फुटून खारे पाणी शेतात घुसते.

ग्रामस्थ हैराण 

पाणी अनेकदा गावात शिरते या समस्‍येमुळे ग्रामस्‍थ पुरते हैराण झाले आहेत  जमीन ओस टाकण्‍याची वेळ इथंल्‍या शेतक-यांवर आली आहे .

जमीन नापीक 

हजारो एकर जमीन नापीक होत असताना इथं प्रस्‍तावीत असलेला वीज प्रकल्‍पही दृष्‍टीक्षेपात नाही ,अशा दुहेरी कात्रीत इथंला शेतकरी सापडलाय