यंदा गुळावर आलीए 'संक्रांत'

संक्रांतीपूर्वी गुळाला मोठी मागणी असते त्यामुळं या काळात राज्यातील गुळ उत्पादकांच्या गुळाला चांगला दर मिळतो.

Updated: Jan 12, 2018, 11:21 AM IST
यंदा गुळावर आलीए 'संक्रांत' title=

मुंबई : संक्रांतीपूर्वी गुळाला मोठी मागणी असते त्यामुळं या काळात राज्यातील गुळ उत्पादकांच्या गुळाला चांगला दर मिळतो.

सातारा जिल्ह्यातील कराड परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी गुळाचं उत्पादन करतात. मात्र यंदा त्यांच्या गुळावर संक्रांत आलीय.

गुळाला फटका 

 साखरेचे दर घसरल्यामुळं त्याचा फटका गुळाला बसला आहे.सातारा जिल्ह्यातील कराडच्या कृषी  उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या गुळाला २५५० ते ३२०० रुपये दर मिळतोय.

उत्पादक हवालदिल

 आज पर्यंत गुळाला ४२०० रुपये दर मिळत होता.  मात्र अचानक दर कमी झाल्याने गुळ उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.