Ajit Pawar: "मी सांगेपर्यंत मोबाइल बंद ठेव...", लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर अजित पवारांचा गौप्यस्फोट!

Laxman Jagtap passed away: 2009 मध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघ अस्तित्त्वात आला आणि त्यावेळी त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती. लक्ष्मण जगताप पहिल्याच निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले. 

Updated: Jan 5, 2023, 09:18 PM IST
Ajit Pawar:  "मी सांगेपर्यंत मोबाइल बंद ठेव...", लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर अजित पवारांचा गौप्यस्फोट! title=
Ajit Pawar,Laxman Jagtap

Ajit Pawar On Laxman Jagtap: पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap ) यांचे दोन दिवसापूर्वी दीर्घ आजाराने निधन (Laxman Jagtap passed away) झालं. गेल्या काही महिन्यांपासून कॅन्सरशी त्यांचा लढा सुरु होता. अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात शोक व्यक्त करण्यात येत आहे. अशातच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी लक्ष्मण जगताप यांच्या घरी जावून घरच्यांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी अजित पवारांनी 2004 च्या विधान परिषद निवडणुकीचा किस्सा सांगितला. (ajit pawar has reminisced about an election by visiting late mla laxman jagtaps house as a consolation) 

2004 मध्ये लक्ष्मण जगताप यांना राष्ट्रवादीकडून (NCP) मावळ लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यानंतर जगताप यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी शेकापच्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. मात्र त्यावेळी निवडणुकीत जगताप यांचा पराभव झाला होता. 2009 मध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघ अस्तित्त्वात आला आणि त्यावेळी त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती. लक्ष्मण जगताप पहिल्याच निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले. त्यावेळीचा किस्सा अजित पवार यांनी सांगितला आहे.

2004 च्या निवडणुकीवेळी चिंचवडची जागा काँग्रेसला (Congress) सोडण्यात आली होती. त्यावेळी आम्हाला आमच्या विचारांचा माणूस निवडून आणायचा होता. म्हणून मी त्याला सांगितलं उमेदवारी अर्ज भर आणि मी सांगेपर्यंत मोबाइल स्विच ऑन करू नको, असं अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं.

आणखी वाचा - मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय! मंडप सजला, सरपंचांचा भव्य शपथविधी सोहळा पार पडला

दरम्यान, दांडगा लोकसंपर्क आणि काम चांगलं असल्यामुळे लक्ष्मण मोठ्या मताने निवडून आला, असं अजित पवार म्हणाले. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. अजित पवार यांचे सर्वांत जवळचे सहकारी म्हणून परिचित असलेल्या लक्ष्मण जगताप यांनी 2014 ला भाजपमध्ये प्रवेश केला होता. काही महिन्यांपूर्वी झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीवेळी आजारी असताना देखील मतदान करण्यासाठी लक्ष्मण जगताप मुंबईला आले होते.