CM शिंदे सरकार फक्त स्वीकारतंय सत्कार; जनता वाऱ्यावर, अजित पवार यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

Ajit Pawar On CM Eknath Shinde : राज्यात दोघांचे सरकार आहे. एक महिना झाला तरी मंत्रिमंडळ विस्तार नाही. सामान्यांचे प्रश्न सोडविण्यास दुर्लक्ष करण्यात येत आहे, अशी जोरदार टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर केली.

Updated: Aug 2, 2022, 12:58 PM IST
CM शिंदे सरकार फक्त स्वीकारतंय सत्कार; जनता वाऱ्यावर, अजित पवार यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल title=

मुंबई : Ajit Pawar On CM Eknath Shinde : राज्यात दोघांचे सरकार आहे. एक महिना झाला तरी मंत्रिमंडळ विस्तार नाही. सामान्यांचे प्रश्न सोडविण्यास दुर्लक्ष करण्यात येत आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गावोगावी सत्कार स्विकारत आहेत. कार्यकर्त्यांच्याकडून सत्कार स्विकारण्यापेक्षा राज्यातील समस्या सोडवल्या पाहिजे. सध्या जनता वाऱ्यावर अशी परिस्थिती दिसून येत आहे, अशी जोरदार टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर केली.

पावसामुळे मोठे नुकसान पशुधन नुकसान मोठे पण मदत अद्याप नाही. सरकारने पुढाकार घेत मदत जाहीर केली पाहिजे. एक महिना झाला मंत्रिमंडळ विस्तार नाही. दिल्लीची परवानगी नाही की, दिलेले आश्वासन पूर्ण करु शकत नाही, म्हणून मंत्रीमंडळ विस्तार थांबला का, असा सवाल त्यांनी उपस्थित केले आहे. उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याकडे कोणतेही खाते, चार्ज नाही. मुख्यमंत्री यांच्याकडे 42 मंत्र्यांची  खाती एकट्याकडे आहेत. तर ते वेळ कसे देणार, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.

सत्कार समारंभाऐवजी कारभार चालवा - पवार

राज्यात प्रामुख्याने विदर्भात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, अद्यापपर्यंत राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. यावरुन विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी राज्यातील जनता त्रस्त असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सत्कार सभारंभात व्यस्त असून, त्यांनी हे सत्कार समारंभात सहभागी होण्याऐवजी कारभार व्यवस्थित चालवा, असा सल्ला अजित पवार यांनी मुख्यमंत्र्याना दिला.

 राज्यात ज्या ठिकाणी मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे, तेथे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. राज्यात काही दिवसांपू्र्वी कोसळलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आणि सामान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. असे असताना राज्याचे प्रश्न सोडून मुख्यमंत्री गावोगावी सत्कार घेत फिरतात, अशा शब्दांत अजित पवार यांनी जोरदार टीका केली.