'लव्ह जिहाद'नंतर 'लँड जिहाद'चा महाराष्ट्राला धोका? नेमकं हे प्रकरण आहे तरी काय?

लव्ह जिहादनंतर आता लँड जिहादचा मुद्दा डोकं वर काढतोय. भाजप आमदार नितेश राणेंनी लँड जिहादप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. 

Updated: Oct 3, 2023, 11:30 PM IST
'लव्ह जिहाद'नंतर 'लँड जिहाद'चा महाराष्ट्राला धोका? नेमकं हे प्रकरण आहे तरी काय? title=

Special Report on Land Jihad : जिहादपाठोपाठ आता लँड जिहादनं डोकं वर काढलंय, महाराष्ट्राला लँड जिहादचा विळखा पडलाय आणि त्याची सुरुवात झालीय मालेगावपासून. असं आम्ही म्हणत नाहीयोत तर हे आरोप केले आहेत ते सत्ताधारी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी. मात्र, अचानक लँड जिहादचा विषय समोर का आला, लँड जिहाद म्हणजे नेमकं काय ह?  नितेश राणेंनी केलेले आरोप सर्व काही धक्कादाय आहे. 

नितेश राणेंचे आरोप काय? 

लव्ह जिहाद पाठोपाठ आता लँड जिहादने डोकं वर काढलंय असा गंभीर आरोप भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी केलाय. या प्रकरणात प्रशासनातले काही अधिकारी आहेत असा त्यांनी दावा केलाय. मालेगावमध्ये बांगलादेशी आणि रोहिंगे यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय, बांगलादेशींची वस्ती वसवण्याचे प्रकार काही अधिकारी करत आहेत असा आरोप नितेश राणेंनी केला आहे. मालेगावात तुकडेबंदी कायदा धुडकावत जमिनीची खरेदी-विक्री सुरु आहे. बांग्लादेशी-रोहिंग्यांची वस्ती बसवण्याचं काम अधिकारी करतात असे गंभीर आरोप नितेश राणे यांनी केले आहेत. 

मुंबईत माहिम दर्ग्याजवळ समुद्रात अतिक्रमण

मुंबईत माहिम दर्ग्याजवळ समुद्रात अतिक्रमण करण्यात आलं होतं, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्हिडीओ दाखवत हा प्रकार उघड केला होता.. मुंबादेवी डोंगरावरच्या मजारीच्या अतिक्रमणाचा मुद्दाही मनसेनं समोर आणला होता. त्यानंतर लँड जिहादचे प्रकार महाराष्ट्रात घडतायत, याची चर्चा सुरु झाली होती.

लँड जिहाद म्हणजे नेमकं काय ?

इतर धर्मियांच्या जमिनी बळकवण्याचा पूर्वनियोजित कट असल्याचे बोलले जात आहे. सार्वजनिक मालकीच्या जमिनी बळकवण्याचा प्लॅन आहे.  परधर्मियांच्या जमिनीवर धार्मिक विधी, प्रार्थना करत कब्जा करायचा अशा प्रकारे जमिनी बळकावल्या जातात. 

माहिम दर्गा येथील अतिक्रमणाचा मुद्दा समोर येताच शिंदे-फडणवीस सरकारनं तातडीनं कारवाई केली होती. आता मालेगावप्रकरणाचा मुद्दा खुद्द भाजप आमदार नितेश राणेंनी मांडलाय.. त्यामुळे या लँड जिहाद आरोपांप्रकरणी सरकारनं लक्ष घालण्याची मागणी होत आहे.