Abhijit Bichukale on cm eknath shinde: नगरसेवक पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत प्रत्येक निवडणुकीत स्वतःला ग्रेट समजत उमेदवारी अर्ज भरणाऱ्या अभिजित बिचुकले (Abhijeet Bichukale) आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
सतत काहींना काही विधान करून चर्चेत राहणारे बिचुकले पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेण्याच्या तयारीत आहेत. यावेळी त्यांच्या निशाण्यावर आहेत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKNATH SHINDE). काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांवर तोंडसुख घेतल्या नंतर आता बिचुकले मवाळ झालेत आणि आता तर चक्क मुख्यमंत्र्यांच्या बाजूने बोलत आहेत.
नेहमीच आपल्या विधानामुळे चर्चेत येणारे अभिजीत बिचुकले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दर्शवलाय. बिचुकले यांनी वर्षावर मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिंदेंचं अभिनंदन केलंय. साताऱ्याच्या गादीचा वैचारिक वारसदार असल्याचं सांगत,येणाऱ्या काही दिवसांत भूमिका मांडणार असल्याचं बिचुकले यांनी स्पष्ट केलंय.
मराठी बिग बॉसचे सुत्रसंचालन अभिनेता महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) करत आहेत. मराठी बिग बॉसचा चौथा सिझन लवकरच प्रदर्शित होणार आहे. या नव्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून कोण असणार आहेत हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. दरम्यान, महेश यांनी
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिजीत बिचुकलेंसंदर्भात (Abhijit Bichukale) प्रश्न विचारण्यात आला. यावेळी बिचुकले शोमध्ये सहभागी होत नसल्याची तक्रार महेश मांजरेकरांनी केली. या प्रकरणावर बिचुकलेनं उत्तर दिलं आहे.
''महेश मांजरेकरांना विचारावं लागेल की गेम म्हणजे नेमका कोणता गेम? गेम लावायचा की गेम करायचा? ते जसं मला सांगतील तसा मी गेम खेळू शकतो, पण सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, आमच्यासारखी हरहुन्नरी माणसं शोधून तिथे नेतात. जे शोधून नेतात ते एंडोमल कंपनीचं काम आहे.
एंडोमल कंपनीने मला हिंदीमध्ये लाँच केलं. मला वाटतं, महेश मांजरेकर तिथे पैसे घेऊन नोकरी करतात. त्यामुळे त्यांच्या विधानाला किती महत्त्व द्यायचं', असा खोचक सवाल बिचुकलेनं केला. (mahesh manjrekar abhijit bichukle bigg boss marathi)
'मी बिग बॉस गाजवलं. माझ्यामुळे हा शो घराघरात गेला. याची जाण एंडोमल कंपनीला असेल तर महेश मांजरेकरांच्या कुठल्याही वक्तव्याला ती कंपनी तशी किंमत देणार नाही. भविष्यात कदाचित मी बिग बॉस मराठीचा अँकर असेन', असा विश्वास बिचुकले आहे. त्याचसोबत जरएंडोमल कंपनीनं विचारलं तर हिंदीतही भाग घेईन असं तो पुढे म्हणाला.