Bogus Student : राज्यातील 24 लाख 60 हजार विद्यार्थी बोगस, 60 शिक्षकांच्या नोकरीवर गदा?

Nagpur News : राज्यात जवळपास 24 लाख विद्यार्थी शिक्षणापासून मुकणार का असा प्रश्न निर्माण झाले आहेत. एका अहवालानुसार या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अवैध ठरलं आहे. 

नेहा चौधरी | Updated: May 17, 2023, 11:50 AM IST
Bogus Student : राज्यातील 24 लाख 60 हजार विद्यार्थी बोगस, 60 शिक्षकांच्या नोकरीवर गदा? title=
aadhaar card state 24 lakh 60 thousand students Bogus and 60 thousand teachers extra in school

Bogus Student News : राज्यातील पालक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यभरातील शाळांमधून (School) तब्बल 24 लाख 60 हजार विद्यार्थी  (Students) बोगस ठरण्याची शक्यता आहे. शिक्षण विभागाकडून 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी संच मान्यतेची प्रक्रिया सुरु आहे. या प्रक्रियेत राज्यभरातील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड तपासले जात आहेत. आतापर्यंत राज्यातील 1 कोटी 91 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे आधार कार्ड (Aadhaar Card) तपासण्यात आले असून यातील 24 लाख 60 हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अवैध (Aadhaar card invalid) ठरलेत.

त्यामुळे संच मान्यता प्रक्रियेतील नियमानुसार हे सर्व विद्यार्थी अतिरिक्त म्हणजेच बोगस विद्यार्थी ठरण्याची शक्यता आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं विद्यार्थी बोगस ठरल्यास 60 हजार शिक्षक  (Teachers) अतिरिक्त ठरण्याची भीती आहे. त्यामुळे शिक्षक भरतीची घोषणा फसवी असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळानं केलाय.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कार्याध्यक्ष विजय नवल पाटील आणि सरकार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी संच मान्यतेबाबत एक निवेदन शिक्षण मंत्री दिपक केसरकरांना दिलं. या निवेदनानुसार संच मान्यता म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचं म्हटलं आहे. राज्यातील शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी संच मान्यतेची प्रक्रिया करण्यात येत आहे. यानुसार सर्व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड तपासण्यात आले. या तपासणीतर्गंत राज्यातील 1 कोटी 91 लाख विद्यार्थ्यांचे आधार कार्ड UIADI ने पडताळले आहेत. त्यानुसार 24 लाख 60 हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अवैध आढळले आहेत. यामुळे राज्यातील 60 हजार शिक्षक अतिरिक्त असल्याने त्यांचा नोकरीवर गदा येण्याची शक्यता वर्तविण्यात येतं आहे. त्याशिवाय राज्यातील शिक्षक भरती ऑगस्टपर्यंत करता येणार नाही आहे. (aadhaar card state 24 lakh 60 thousand students Bogus and 60 thousand teachers extra in schoo)

विद्यार्थ्यांना आधार कार्डची सक्ती? (Aadhaar card compulsory for students)

शाळा महाविद्यालयांना नव्याने अनुदानासाठी संच मान्यता गरजेची आहे. विद्यार्थ्यांना अनुदार हवं असल्यास त्यांचं आधार कार्ड अपडेट असणे गरजेचं आहे. सरकारच्या विविध शैक्षणिक योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना हवे असल्यास त्यांचं आधार कार्ड अपडेट असल्यास त्यांना याचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे अजूनही राज्यातील विद्यार्थ्यांनी आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर त्यांनी त्वरित करणे गरजेचं आहे.