Dombivli Crime News : डोंबिवलीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. सुखी संसार सुरु असताना अचानक सगळचं सपलं आहे. एका विवाहितेने आपल्या दोन वर्षाच्या मुलीची हत्या करुन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलिस या हत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. डोंबिवलीच्या रूनवाल मायसिटी या उचूभ्र सोसायटीत ही अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस सखोल तपास करत आहेत. पोलिसांनी घटनास्थाळावरुन मृतदेह ताब्यात घेतले आहेत.
डोंबिवलीच्या रूनवाल मायसिटी या उचूभ्र सोसायटीमध्ये आय टी इंजिनियर राहुल सकपाळ, पत्नी पूजा, अपंग आई आणि दोन वर्षांची समृद्धी या मुलीसोबत राहत होते. मात्र पूजाने दोन वर्षांच्या समृध्दीची रुमालाने गळा दाबून हत्या केली आणि स्वतः पंख्याला गळफास घेत आपला जीवन संपवलं.
रविवारी रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला. यावेळी राहुल हा सोसायटीच्या कामानिमित्त बाहेर गेला असतांना हा प्रकार घडला. दरम्यान याप्रकरणी पूजाचा पती राहुलच्या फिर्यादी वरून मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस सखोल तपास करत आहेत. दरम्यान ही आत्महत्या आहे की हत्या आहे याचा पोलीस तपास करत आहेत.मात्र पती पत्नी मद्धे कोणतेही वाद नसतांना पूजाने इतके टोकाचे पाऊल का उचलले याचं गूढ उलघडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
नाशिकच्या पाथर्डी गावात टोळक्याच्या हल्ल्यात एका युवकाचा मृत्यू झालाय... चार ते पाच जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने वार करत खून केलाय...नंदेश साळवे असं मृत तरुणाचं नाव आहे...याबाबत हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.