ताबा सुटला आणि घात झाला, कार अपघातात 4 मित्रांचा दुर्देवी मृत्यू, पाहा व्हीडिओ

जिगरी आणि जिवाभावाच्या 4 मित्रांचा कार अपघातात दुर्देवी मृत्यू झालाय. तर एकावर उपचार सुरु आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळाय.

संजय पाटील | Updated: Jul 28, 2022, 06:32 PM IST
ताबा सुटला आणि घात झाला, कार अपघातात 4 मित्रांचा दुर्देवी मृत्यू, पाहा व्हीडिओ  title=

प्रवीण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया : कशाशीही तुलना करता येत नाही अशी ती मैत्री. मैत्रीत अनेक जण शेवटपर्यंत एकत्र राहणयाच्या आणाभाका घेतात. पण मैत्री अखेरपर्यंत निभावणारे हे मोजकेच असतात. अशाच जिगरी आणि जिवाभावाच्या 4 मित्रांचा कार अपघातात दुर्देवी मृत्यू झालाय. तर एकावर उपचार सुरु आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळाय. अपघाताची ही घटना विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात घडलीय.  (4 young man died in car accident and 1 serious injured at gondia district maharashtra)

नक्की काय झालं?

जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खोबा गावाजवळ हा अपघात झालाय. हे 4 मृत तरूण हे आमगाव तालुक्यातील असल्याची माहिती आहे. हे 5 मित्र नवेगावबांध इथं सोलर पंप फिटिंगच काम करण्यासाठी गेले होते. हे काम पूर्ण करुन परतत असताना घात झाला. परतताना गाडी चालवणाऱ्या तरुणाचं ताबा सुटला. कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार रस्त्यावरून खाली कोसळली. यात 4 मिंत्रांचा जागीच मृत्यू झाला. तर यातील गंभीर जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

एकाच वेळी 4 मित्रांचा मृत्यू झाल्या महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला 4 मित्र आपल्याला सोडून गेल्याचा जोरदार धक्का हा अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला बसला आहे.

मृत तरुणांची नावं

रामकृष्ण बिसेन (24 वर्ष), सचिन कटरे (24 वर्ष),  संदीप सोनवण (18 वर्ष) आणि निलेश तुरकर (27 वर्ष) अशी मृत तरुणांची नावं आहेत. तर प्रदीप बिसेनवर (24 वर्ष) उपचार सुरु आहेत.