मेळघाटात एकाच वेळी चार पटेद्दार वाघांचे दर्शन

मेळघाटात वाघाच्या अस्तित्वावरच गेल्या काही वर्षात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असतानाच आज पहाटे अकोला येथील वन्यजीव आणि पर्यावरण प्रेमींच्या एका ग्रुपला चार पट्टेदार वाघांचे दर्शन घडले.

Updated: Feb 16, 2018, 11:34 PM IST
मेळघाटात एकाच वेळी चार पटेद्दार वाघांचे दर्शन title=

अमरावती : मेळघाटात वाघाच्या अस्तित्वावरच गेल्या काही वर्षात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असतानाच आज पहाटे अकोला येथील वन्यजीव आणि पर्यावरण प्रेमींच्या एका ग्रुपला चार पट्टेदार वाघांचे दर्शन घडले.

अकोला येथील वन्यजीव आणि पर्यावरण प्रेमी इमरान खान हे मेळघाटात नेहमीच भ्रमंती करत असतात. अकोला येथीलच काही सहका-यांसोबत ते खासगी वाहनातून आज पहाटे चारच्या सुमारास या पट्टेदार वाघांचे दर्शन झाले. हे पट्टेदार वाघ अचानक त्यांच्या वाहनासमोर आले आणि बाजूच्या जंगलात निघून गेला. इमरान खान यांनी लगेच त्याचे छायाचित्र आपल्या कॅमेरात टिपले. एकाच वेळी चार पट्टेदार वाघ एकत्र बघायला मिळणं हे मेळघाटात दुर्मिळच आहे. यावरून मेळघाटात वाघांची संख्या जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.