लहान वयात केस का पांढरे होतात? डॉक्टर सांगतात, तुमच्या 'या' चुका...

कमी वयातच आजकाल तरुण पिढीमध्ये अनेकांचे केस पांढरे झाल्याच पाहिला मिळतात. यामागे काय कारणं आहे, याबद्दल डॉक्टर म्हणाले की, तुमच्या चुका यासाठी कारणीभूत ठरतात. 

नेहा चौधरी | Updated: Dec 5, 2024, 01:20 PM IST
लहान वयात केस का पांढरे होतात? डॉक्टर सांगतात, तुमच्या 'या' चुका... title=

आजच्या तरुण पिढीमध्ये कमी वयातच अनेक आरोग्याच्या समस्या दिसून येतात. त्यातील एक समस्या आहे, ती म्हणजे तरुणपणाच केस पांढरे होणे, यामुळे अनेकांच्या लग्नात अडचणीदेखील येतात. केस पांढरे होणे म्हणजे म्हातारपणाचे लक्षण आहे. पूर्वीच्या काळी वृद्धपकाळात केस पांढरे व्हायचे. मात्र आजकाल 30 वर्षे किंवा त्याहूनही आधीच्या लोकांमध्ये केस पांढरे होण्याची समस्या वाढली आहे. या समस्या असणाऱ्यांना कायम प्रश्न पडतो. कमी वयात केस पांढरे का होतात. यामागे तुमच्या कुठल्या चुका कारणीभूत ठरतात का? याबद्दल डॉक्टर डॉ. रुबेन भसीन पासी (सल्लागार – त्वचाविज्ञान, सीके बिर्ला हॉस्पिटल गुरुग्राम) यांनी प्रश्नाच उत्तर दिलंय. 

डॉ. रुबेन सांगतात की, तुमच्या अनेक चुका यामागील कारणं असू शकता, पण नेमकं काय कारणं आहेत ते पाहूयात. 

अनुवांशिकता -  जर तुमच्या पालकांचे केस लवकर पांढरे झाले असतील तर ही समस्या तुम्हालाही होऊ शकते. 

तणाव - जास्त काळजीमुळे केस लवकर पांढरे होतात. 

अयोग्य आहार - हो, अगदी बरोबर, योग्य आहार न घेतल्याने आणि पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केस कमकुवत आणि पांढरे व्हायला सुरुवात होते. 

रसायने असलेली उत्पादने - केसांचा जास्त रंग, जेल किंवा रसायने वापरल्याने केसांना नुकसान पोहोचते. 

धूम्रपान आणि मद्यपान - या सवयींमुळे केस अकाली पांढरे होतात. 

शारीरिक समस्या - थायरॉईडसारखे आजार किंवा हार्मोन्समध्ये बदल हे देखील यामागील कारणं असतात. 

केस अकाली पांढरे होऊ नये म्हणून ही काळजी घ्या 

योग्य खाण्याच्या सवयी - हिरव्या भाज्या, फळे, कडधान्ये आणि सुका मेवा खा. विशेषतः व्हिटॅमिन बी 12 आणि आयर्नयुक्त पदार्थांचं सेवन करा. 

तेलाने मसाज करा - केसांना नारळ, आवळा किंवा बदामाचे तेल लावा. यामुळे केस मजबूत आणि काळे होण्यास मदत मिळते. 

आवळा आणि शिककाई - केस धुण्यासाठी आवळा आणि शिककाई वापर करा. हे केसांना नैसर्गिकरित्या पोषण देतात. 

तणावापासून दूर रहा  - दररोज योग आणि ध्यान करा. यामुळे तुमचा ताण कमी होण्यास मदत मिळेल. 

रसायने टाळा - केसांवर जास्त केसांचा रंग किंवा रासायनिक उत्पादने वापरू नका.

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)