Video : असं म्हणतात की, बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा तो क्षण जन्मदात्या आईलाही नव्यानं जन्म देऊन जातो. 9 महिनेय गर्भात वाढलेलं बाळ जेव्हा प्रत्यक्ष जन्म घेतं तेव्हा ते नव्या वातावरणाशी मिळतंजुळतं करण्याचा प्रयत्न करतं. मुळात बाळाच्या शरीराची रचनाच त्या धाटणीची असते.
कोणतंही नवजात बालक सहा महिन्यांपर्यंत मोठं होत असताना दर दिवशी त्याच्या शरीरात नवनवीन बदल होत असतात. अशा या नवजात बालकाविषयीच्या काही अनपेक्षित गोष्टी इन्स्टाग्रामवर चर्चेत असणाऱ्या इन्फ्लुएन्सर ध्रुव राठी यानं एका व्हिडीओच्या माध्यमातून सर्वांसमोर आणल्या आहेत. या काही अशा गोष्टी आहेत ज्या पाहून, ऐकून सारे हैराण होत आहेत.
काही दिवसांपूर्वीच ध्रुवनंही त्याच्या कुटुंबात एका बाळाचं स्वागत केलं, ज्यानंतर जीवनातील एका नव्या प्रवासाचा अनुभव घेणाऱ्या याच ध्रुवनं बाळांबद्दलच्या फार कमाल गोष्टी सर्वांपुढं मांडल्या. काय आहेत त्या गोष्टी? पाहा...
- जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा त्यांना फक्त काळा आणि पांढरा असे दोनच रंग दिसतात. त्यांना दिसतो तो पहिला रंग असतो लाल. जन्मानंतर काही आठवड्यांनी या लाल रंगाची ओळख त्यांना होते. जवळपास सहा महिन्यांनंतर बाळाला सर्वसामान्य प्रौढांना दिसतात ते सर्व रंग दिसू लागतात.
- सुरुवातीच्या दिवसांमध्ये बाळाची दृष्टी अतिशय धुसर असते. सुरुवातीला त्यांना फक्त 20 ते 30 सेंटीमीटर अंतरावर असणाऱ्या गोष्टीच दिसतात.
- जन्मताच बाळ रडतं हे जरी खरं असलं तरीही त्याच्या डोळ्यातून पाणी मात्र येत नाही. कारण, डोळ्यांमध्ये अश्रू आणणारी प्रणाली दोन ते तीन महिन्यांनी विकसित होते.
- दोन महिन्यांपर्यंत मुलं एका निश्चित गोष्टीला पाहून किंवा आवाजानं हसूही शकत नाहीत. बाळ फक्त आणि फक्त झोपेतच हसतं.
- एखादं बाळ जेव्हाजेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याच्यामध्ये कैक गोष्टी, शरीरातील अवयव विकसित झालेले नसतात. असं असलं तरीही ही लहान मुलं उत्तमपणे पोहू शकतात हे मात्र खरं.
- एका नैसर्गिक क्रियेच्या बळावर बाळ पाण्यात जातात पोहू शकतं. बाळाचा श्वास पाण्यात बुडताच थांबतो. पण, ही सहज क्रिया जन्मानंतर अवघ्या 6 महिन्यांपर्यंत सुरू असते. यानंतर मात्र मुलांना पोहणं शिकावं लागतं.