'नावरस नाव' म्हणजे काय? 'उ' अक्षरावरून मुलींची 10 नावे आणि अर्थ

Baby Name on U : अनेकदा पालक मुलांची नावे ठेवताना विशिष्ट अक्षराचा विचार करतात. तुम्ही जर 'उ' अक्षरावरुन लेकीला नाव देण्याचा विचार करत असतील तर खालील 15 नावांच्या यादीचा विचार करा. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 10, 2023, 02:00 PM IST
'नावरस नाव' म्हणजे काय? 'उ' अक्षरावरून मुलींची 10 नावे आणि अर्थ  title=

Top 10 Baby Girls Name on U Letter : हिंदू धर्मात अनेकदा विशिष्ट अक्षरावरून नाव ठेवले जाते. कारण नावरस नाव हा प्रकार आहे. या पद्धतीने एक विशिष्ट अक्षर दिले जाते. त्या मुळाक्षरावरुन नाव ठेवले जाते. पालक कायमच आपल्या मुलीसाठी खास नाव शोधत असतात. अशावेळी जर तुम्ही 'उ' अक्षरावरुन मुलीचे नाव ठेवू इच्छित असाल तर खालील 15 नावांची यादी जरुर पाहा. 

नावरस नाव म्हणजे काय?

बाळाचे नाव ठेवताना ज्योतिषी एखादे विशिष्ट अक्षर सुचवतात, आणि त्या अक्षराने सुरु होणारे नाव ठेवायला सांगतो. ही अक्षरे त्या बाळाच्या राशीला अनुसरून असतात. अशा नावाला 'नावरस नाव' असे म्हणतात. 'नावरस नाव' हे त्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून रास ओळखता यावी यासाठी ठेवले जाते. म्हणजे ही एक सोय आहे. मात्र या नावाचा इतर असा काहीच फायदा नाही. नावरस नाव आणि प्रत्यक्षातले नाव हे वेगवेगळे असते. किंबहुना नावरस नाव प्रत्यक्ष नाव म्हणून वापरू नये असेही अनेकजण सांगतात.  त्यामुळे बाळाचे रोजच्या वापरासाठी नाव ठेवताना त्या नावाचे राशीनुसार पहिले अक्षर काय असावे याचा विचार अजिबात करू नये.

'U' अक्षरावरुन मुलींची 15 नावे आणि अर्थ 

उदिता 
उगवलेला सूर्य, उद्या जे उजाडणार आहे, असा या नावाचा अर्थ आहे. या नावाचा अर्थ अतिशय खास आहे. मुलीसाठी तीन अक्षरी हे हटके नाव देऊ शकता. 

उर्वी 
उर्वी या नावाचा अर्थ आहे पृथ्वी. राजकुमारी असा देखील या नावाचा अर्थ आहे. वृषभ अशी या नावाची रास आहे तर 7 हा त्याचा शुभांक आहे. 

उर्शिता 
उर्शिता हे हिंदू कुटुंबातील नाव आहे. याचा अर्थ आहे निश्चित इंग्रजीत Firm असा याचा अर्थ आहे. या नावाचा शुभांक 6 असा आहे. मुलीसाठी हे नाव अतिशय खास ठरु शकतं. 

उर्मिका
'उर्मिका' या नावाचा अर्थ आहे छोटी लाट. तुमच्या मुलीच्या जन्माने तुमच्या जीवनात एक आनंदाची लाट आली असे तर या नावाचा मुलीसाठी नक्की विचार करू शकता. 

उपासना
'उपासना' हे चार अक्षरी शब्द आहे. 'उ' अक्षरासाठी तुम्ही या नावाचा विचार करु शकता. या नावाचा अर्थ आहे पूजा, संस्कृतमध्ये याचा अर्थ आहे भक्ती. तुम्ही मुलीसाठी या नावाचा नक्कीच विचार करु शकते. 

उर्जनी
'उर्जनी' हे अतिशय युनिक नाव आहे. या नावाचा अर्थ आहे. उर्जेशी संबंधीत... तुम्ही या नावाचा नक्की विचार करा. युनिक अशा या नावाचा शुभांक आहे 1 असा आहे. 

उर्जिता 
'उर्जिता' या नावाचा अर्थ आहे उत्साहित, उत्सर्जित. या नावाचे शुभांक आहे 7. तुम्ही वृषभ राशीच्या या नावाचा मुलीच्या नावासाठी नक्कीच विचार करु शकता. 

उर्मी
उर्मी हे नाव अतिशय गोड आहे. दोन अक्षरी नावाचा विचार करत असाल तर या नावाचा नक्कीच विचार करु शकता. 'उर्मी' या नावाचा अर्थ देखील ऊर्जा असा आहे. 

उदयंती 
'उदयंती' या नावाचा अर्थ आहे उठणे आणि गुणधर्म. या नावाचा विचार करायला काहीच हरकत नाही. या नावाचा शुभांक आहे 5 तर वृषभ ही त्याची रास आहे. 

उक्ता 
'उक्ता' या नावाचा अर्थ अतिशय खास आहे. संबोधित करणे असा या नावाचा अर्थ होतो. 8 शुभांक असलेल्या या नावाची रास आहे वृषभ. मुलीसाठी या नावाचा नक्कीच विचार करा.