मुलांवर ओरड्यामुळे मानसिक आरोग्याचा धोका 50% ने वाढतो, होतात 5 गंभीर परिणाम

Parenting Tips : मुलांच्या चुकीच्या वागण्याने पालकांनी नाराज होणे अतिशय सामान्य आहे. परंतु त्यावेळी पालक म्हणून तुम्ही कशी प्रतिक्रिया देता याचा मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर आणि त्यांच्या दीर्घकालीन आरोग्यावर खोलवर परिणाम होतो.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 7, 2023, 07:59 PM IST
मुलांवर ओरड्यामुळे मानसिक आरोग्याचा धोका 50% ने वाढतो, होतात 5 गंभीर परिणाम title=

मुलांच संगोपन करत असताना पालक दरवेळी नव्याने काही शिकत असतो. मुलं ऐकत नाही, हट्टी झालीत यामुळे अनेकदा पालक त्यांच्यांवर रागवतात आणि चिडतात देखील. पण अशा पद्धतीने प्रतिसाद देत असताना मुलांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होत असतो. पालक म्हणून तुम्ही मुलांशी कशा पद्धतीने वागता हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. 

कारण पालकांचं ओरडणं, चिडणं मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतं. लहान मुलांवर आपण जे संस्कार करु तसेच होतात. असं होत असताना पालकांनी मुलांवर ओरडल्याने त्यांच्या मेंदूच्या विकासावर परिणाम होतो. एवढंच नव्हे काही मुलं तर डिप्रेशनमध्ये जातात. त्यामुळे मुलांवर ओरडण्यापूर्वी पालकांनी त्याचे लाँग टर्म साईड इफेक्टस जाणून घ्या. 

ओरडल्यामुळे वर्तन बदलते

तुम्हाला अनेकदा वाटेल की मुलांवर ओरडणे त्या वेळी त्यांचे वाईट वर्तन थांबवते, परंतु संशोधन असे सांगते की, दीर्घकाळात ही समस्या मोठी होते. ओरडण्याने मुलाचे वर्तन बिघडते, कारण प्रत्येक वेळी तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त ओरडावे लागते.

ओरडल्यामुळे मेंदूच्या विकासावर परिणाम

ओरडणे आणि इतर कठोर पालकत्व तंत्र मुलाच्या मेंदूच्या विकासाच्या मार्गात बदल करतात. तो चांगल्या माहिती आणि घटनांपेक्षा नकारात्मक गोष्टींवर सहज प्रक्रिया करू लागतो. त्यामुळे पालकांच्या ओरडण्याचा मुलांवर नकारात्मक परिणाम होतो. आणि ही मुलं पालकांपासून थोडी दूर जातात. 

ओरडण्यामुळे मुले डिप्रेशनचे शिकार

जेव्हा पालक मुलांवर ओरडतात तेव्हा ते दुखावतात, घाबरतात आणि दुःखी होतात. या भावनिक शोषणाचा थेट संबंध नैराश्य आणि चिंता यांच्याशी असल्याचे संशोधनात म्हटले आहे. त्यामुळे मुलांवर ओरडू नये. मुलं पालकांच्या गोष्टी गांभीर्याने आणि मनाला लावून घेतात. याचा परिणाम त्यांच्यावर खूप होतो.  

शारीरिक आरोग्यावर परिणाम 

मुलांवर ओरडल्यामुळे जो ताण येतो, त्यामुळे पुढे ते अनेक प्रकारच्या शारीरिक आरोग्याच्या समस्यांना बळी पडतात. मुलं पालकांच्या ओरडण्याचा खूप खोलवर विचार करतात. यामुळे त्यांच्या मनावर आणि शरीरावर परिणाम होतो. मुलं कमी जेवतात. फार विचार करतात. 

ओरडण्यामुळे मुलांना तीव्र वेदना होतात.

एका संशोधनानुसार, मुलांवर ओरडणे आणि भविष्यात तीव्र वेदना यांचा खोलवर संबंध आहे. विशेषतः संधिवात, पाठ आणि मानेच्या समस्या. मुलांवर रागावल्याने त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. याचा परिणाम त्यांच्या भविष्यावर होत असतो.