जिजाऊंसाहेबांपासून ते सईबाईंपर्यंत; शिवबांच्या जीवनातील कर्तृत्त्ववान महिलांच्या नावावरून ठेवा तुमच्या लेकीचं नाव

Marathi Baby Girls Names on Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण आज प्रत्येक नागरिक करत आहे. असं असताना मुलांसाठी नावे निवडताना शिवरायांच्या जीवनाशी संबंधीत महिलांची नावे निवडा. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 28, 2023, 04:20 PM IST
जिजाऊंसाहेबांपासून ते सईबाईंपर्यंत; शिवबांच्या जीवनातील कर्तृत्त्ववान महिलांच्या नावावरून ठेवा तुमच्या लेकीचं नाव title=

Marathi Baby Girls Names on Chhatrapati Shivaji Maharaj : लेकीसाठी नावाचा विचार करताना पालक खास करून बाबा फार विचार करतात. अनेकजण आपल्या जीवनात छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य मानतात. शिवरायांना आदर्श मानत असल्यामुळे आपल्या मुलीमध्ये देखील ते गुण, शिकवण उतरावी असं वाटत असतं. अशावेळी तुम्ही छत्रपती शिवाजी महारांज्या नावावरुन किंवा त्यांच्या जीवनात आलेल्या महिलांवरुन मुलींची नावे ठेवू शकता. कारण शिवाजी महाराजांच्या जीवनावर, व्यक्तीमत्त्वावर अनेक महिलांचा प्रभाव आहे. म्हणजे अगदी आई जिजाऊंपासून ते अगदी सईबाईंपर्यंत प्रत्येकीनेच त्यांना काही ना काही शिकवलंय, मनापासून दिलंय. अशावेळी तुम्ही मुलींसाठी ही छान नावे नक्कीच देऊ शकता. 

जिजाऊ 

माँ जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं. फक्त आई म्हणून नाही तर मार्गदर्शक, गुरु म्हणूनही त्या कायमच छत्रपतींच्या मागे कायम उभ्या राहिल्या. माँ जिजाऊंचे गुण आपल्या मुलीच्या जीवनात यावेत असं वाटत असेल तर लेकीसाठी 'जिजाऊ' हे नाव नक्कीच ठेवू शकता. 

जिजा 

तुम्ही जिजाऊ या नावाप्रमाणेच लेकीचं नाव 'जिजा' असं ठेवू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईच्या नावावरुन हे नाव नक्कीच ठेवू शकता. 

सई 

सईबाई निंबाळकर या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी. त्यांच्या नावावरुन ठेवा मुलीचे नाव. जो परमात्मा आहे; जो प्रयत्न करतो असा देखील याचा अर्थ. 

सगुणा 

छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी पत्नी सगुणाबाई शिर्के यांच्या नावावरुन ठेवा 'सगुणा' हे नाव. या नावाचा अर्थ आहे सद्गुणी, चांगल्या गुणांनी युक्त, सद्गुणी स्त्री. 

सोयरा 

सोयरा हे अतिशय पांरपरिक आणि हटके नाव वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सोयराबाई मोहिते यांच्या नावावरुन ठेवा मुलीचे नाव. निसर्ग सौंदर्य; चांगुलपणा असा या नावाचा अर्थ आहे. 

पुतळा 

पुतळाबाई पालकर या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी. त्यांच्या नावावरुन देखील तुम्ही 'पुतळा' हे नाव ठेवू शकता. 'पुतळा' या नावाचा अर्थ गोडंस डॉल असा देखील होतो. 

लक्ष्मी 

लक्ष्मी हे अडीच अक्षरी नाव प्रत्येकालाच आवडतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी लक्ष्मीबाई विचारे यांच्या नावावरुन देखील मुलीचे नाव ठेवू शकता. लक्ष्मी म्हणजे परमेश्वराचा आशिर्वाद. 

सकवार

सकवार हे अतिशय युनिक आणि पारंपरिक मुलीचे नाव आहे. सरवारबाई गायकवाड असं छत्रपती शिवरायांच्या पत्नी यांचं नाव. या अतिशय वेगळ्या नावावरुन मुलीचे नाव ठेवू शकता. यांना कमलाबाई या नावाने देखील ओळखले जायचे तर त्या नावाचा देखील विचार करु शकता. 

राजकुरवर

राजकुरवर बाई या छत्रपती शिवाजी महाराज आणि सगुणाबाई शिर्के यांच्या कन्या. महाराजांच्या मुलीच्या नावावरुन ठेवा लेकीचं नाव. 

काशी

काशी किंवा काशीबाई जाधव असं नाव तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नींच्या नावावरुन मुलीचे नाव ठेवू शकता. 

गुणवंता 

गुणवंताबाई इंगळे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी. यांच्या नावाववरुन गुणवंता हे नाव तुम्ही तुमच्या मुलीसाठी ठेवू शकता.