एंझायटीचं खरं कारण काय आहे?
सद्गुरूंच्या मते, एंझायटीचं मूळ कारण म्हणजे आपलं मन आणि शरीर आपलं ऐकत नाही. आपले विचार आणि भावना नियंत्रित करण्याऐवजी आपण त्यांचा बळी होतो. जेव्हा मन अस्थिर आणि बेशिस्त होतं, तेव्हा चिंता आणि अस्वस्थता आपल्या जीवनाचा भाग बनतात. आपलं मन आपल्याच नियंत्रणाखाली असेल, तर चिंता कधीही निर्माण होणार नाही.
परंतु समस्या अशी आहे की, आपण आपल्या मनाला स्थिर कसं करायचं, हे शिकतच नाही. आपल्या शरीराचं आणि मनाचं योग्य प्रकारे ‘इंजिनियरिंग’ समजून घेतलं, तर आपण या समस्येपासून सहज मुक्त होऊ शकतो.
सद्गुरूंचा उपाय: नमस्कार साधना
जर तुम्हाला वेळ कमी असेल किंवा मोठ्या योगसाधना करणं शक्य नसेल, तर नमस्कार साधना हा सोपा उपाय तुम्हाला एंझायटीपासून मुक्त होण्यासाठी खूप उपयोगी पडेल. ही साधना तुमचं मन शांत करेल आणि तुमच्या विचारांमध्ये संतुलन आणेल.
नमस्कार साधना कशी करावी?
1. एका शांत ठिकाणी जमिनीवर आरामात बसा.
2. तुमचे दोन्ही हात नमस्कार मुद्रेत जोडा.
3. तुमच्या आयुष्यात महत्त्वाच्या असलेल्या एखाद्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. ते सूर्य, झाडं, आकाश, एखादं लहान मूल किंवा तुमची प्रिय व्यक्ती असू शकते.
4. त्या गोष्टीकडे पाहत 10-12 मिनिटे राहा आणि मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. त्या गोष्टीने तुमच्या आयुष्यात काही दिलं आहे, त्याबद्दल प्रेमाने विचार करा.
सद्गुरूंच्या मते, ही साधना केल्याने तुमचं मन स्थिर होतं आणि एंझायटी आपोआप दूर होऊ लागते.
एंझायटीमागचं विज्ञान
सद्गुरू सांगतात की, आपलं मन धारदार चाकूसारखं असतं. जर ते योग्यरीत्या वापरलं, तर ते फायदेशीर ठरतं, पण जर ते बेशिस्त असेल, तर आपल्यालाच इजा पोहोचवू शकतं. नमस्कार साधना ही तुमचं मन आणि शरीर स्थिर करण्याचं प्रभावी साधन आहे. ती तुम्हाला संतुलित बनवते आणि तुमच्या आतली अस्थिरता कमी करते.
औषधांचा वापर हा एंझायटीवरचा तात्पुरता उपाय असतो, पण आपल्या मनाला योग्य मार्गदर्शन मिळालं, तर तुम्ही एंझायटी कायमची दूर करू शकता.
हे ही वाचा: https://zeenews.india.com/marathi/health/these-drinks-cause-blockage-of-...
सद्गुरूंचा संदेश:
'तुमचं समाधान, शांतता आणि आनंद औषधांमध्ये नाही, ते तुमच्याच आत आहे. फक्त ते शोधण्यासाठी स्वतःला समजून घ्या.'