4 वर्षात 3 वेळा लग्न करुनही हार्दिक-नताशाचं काय चुकलं, नातं इतकं तकलादू का होतं?

Hardik-Natasha Relationship : हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक यांनी घटस्फोट घेतला आहे. घटस्फोट इतक्या कमी दिवसांत होण्यामागचं कारण काय? नेमकं काय चुकलं? 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jul 19, 2024, 02:52 PM IST
4 वर्षात 3 वेळा लग्न करुनही हार्दिक-नताशाचं काय चुकलं, नातं इतकं तकलादू का होतं? title=

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक यांचा घटस्फोटाच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. या दोघांचा घटस्फोट निश्चित झाला असून नताशा स्टेनकोविक मुलगा अगस्त्यला घेऊन मायदेशी परतली आहे. 18 जुलै 2024 रोजी, या जोडप्याने त्यांच्या सोशल मीडियाद्वारे घटस्फोटाची  बातमी शेअर केली आणि त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे उघड केले. नतासाचा मुलगा अगस्त्य पांड्यासोबत एक दिवस आधी सर्बियाला रवाना झाल्यानंतर ही घोषणा झाली.

नताशा-हार्दिक झाले वेगळे 

पंड्या आणि स्टॅनकोविक यांनी त्यांच्या संयुक्त निवेदनात त्यांचे नाते संपले असल्याचे आणि घटस्फोट घेतल्याचा निर्णय कळवला. "चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर, आम्ही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे," त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. "आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आणि आमचे सर्वस्व दिले, परंतु आम्हाला विश्वास आहे की, हा निर्णय आम्हा दोघांच्या हिताचे आहे. आम्ही आमचे कुटुंब तयार करताना जो आनंद, परस्पर आदर आणि साहचर्य वाटले ते पाहता हा एक कठीण निर्णय होता."

4 वर्षात 3 वेळा लग्न 

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविकचं नातं 4 वर्षांपूर्वी निर्माण झालं. या दोघांची पहिली ओळख अनोखी होती. 'अलग प्रकार का आदमी आया' अशा पद्धतीने नताशा हार्दिकला ओळखू लागली होती. एकमेकांशी बोलणं सुरु झाल्यानंतर 31 डिसेंबर रोजी या दोघांचा साखरपुडा झाला. पण नताशाला हार्दिक कोण आहे? त्याच्याबद्दल फार माहिती नव्हती. नताशा आणि हार्दिकचं 4 वर्षांचं नातं पण या काळात त्यांनी 3 वेळा लग्न केलं. 

नातं निर्माण करायला घाई का? 

2018मध्ये नताशा-हार्दिक यांची ओळख झाली. यानंतर त्यांचं नातं लगेच पुढे गेले. डिसेंबर 2019मध्ये Yacht वर हार्दिकने नताशाला प्रपोझ केलं. 2020 मे मध्ये कोविडच्या काळात या दोघांनी लग्न केलं. जुलै 2020 मध्ये मुलगा अगस्त्यचा जन्म झाला. यानंतर 2023 मध्ये या दोघांनी उदयपुरमध्ये अतिशय शाहीपद्धतीने विवाह सोहळा केला. मग अगदी 2024 जुलै मध्ये घटस्फोट. 
हार्दिक आणि नताशाने जितक्या घाईमध्ये हे नातं निर्माण केलं अगदी त्याच घाईमध्ये नातं संपवलं. 

एकमेकांना भूतकाळ सांगणे चुकीचे 

नताशा आणि हार्दिक पांड्या यांनी अगदी सुरुवातीच्या काळात एकमेकांना आपला भूतकाळ सांगितला. नात्याची सुरुवात करत असताना त्यामध्ये पारदर्शकता असणे आवश्यक आहे. पण तुम्ही तुमचा भूतकाळ कुठपर्यंत सांगणे गरजेचे आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. कारण एकमेकांचा भूतकाळ हा तुमच्या भविष्याचा घातक तर ठरणार नाही ना याची काळजी घेणे आवश्यक आहे.