Baby Boy Names on Lord Hanuman: हिंदू धर्मात चैत्र महिन्यातील पौर्णिमेला 'हनुमान जयंती' साजरी केली जाते. धार्मिक मान्यतांनुसार हनुमानाचा जन्म याच दिवशी झाला होता. हनुमान जन्मोत्सवात बजरंगबलीची पूजा करण्याची परंपरा आहे. असे म्हणतात की, जो कोणी विधीनुसार हनुमानाची पूजा करतो त्याच्या मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील संकटे कमी होतात. या पवित्र दिवशी तुमच्या घरी जर गोंडस मुलाचा जन्म झाला असेल तर तुम्ही त्यासाठी हनुमानाच्या पुढील नावांचा विचार करु शकता. या नावांच्या अर्थांमध्ये हनुमानाप्रमाणे जिद्द, भक्ती आणि पावित्र्य दडलेलं आहे.
आपल्या मुलाने हनुमानजींसारखे बलवान आणि धैर्यवान व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. जर तुम्ही देखील हनुमानजींचे भक्त असाल आणि तुमच्या मुलाचे नाव शोधत असाल तर खालील हनुमानजींची नावे नक्कीच आवडतील. या नावांसोबतच त्यांचा अर्थही सांगितला आहे. चला तर मग जाणून घेऊया पवनपुत्र हनुमानजींच्या नावांबद्दल.