Jaya Bhattacharya Rescues Pet Dog : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जया भट्टाचार्य आणि चित्रपटांसाठी त्यांच्या कामासाठी ओळखल्या जातात. त्या प्राणी बचाव क्षेत्रातही काम करतात. त्यांनी एका लहान पाळीव श्वानाला वाचवलं. त्या श्वानावर एका लहान मुलानं लैंगिक अत्याचार केले होते. त्यानंतर जया यांनी त्या पाळीव श्वानाला एका बास्केटमध्ये ठेवलं. त्या पाळीव श्वानाला डायपर घातलं आणि त्याशिवाय त्याच्या मागच्या पायाली पट्टी केली. त्यांनी सांगितलं की त्या श्वानावर योग्य उपचार सुरु आहेत पण त्याला खूप जास्त वेदना होत आहेत. त्याच्या अंतर्गत अवयवांना झालेली दुखापत यासाठी कारणीभूत आहे.
जया भट्टाचार्यनं याविषयी सांगत इन्स्टंट बॉलिवूडला सांगितलं की 'या दीड महिन्याच्या श्वानाच्या पिल्लावर नायगाव येथे असलेल्या तिवरी गावातील एका चाळीत बलात्कार झाला आहे. त्या श्वानावर सतत बलात्कार झाला आहे. याप्रकरणी त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. आरोपी मुलाला अटक झाली, पण पोलिसांनी त्याला सोडलं. आता या सगळ्यानंतर न्याय कसा मिळणार? हे फक्त प्राण्यांबद्दल नाही, तर सगळ्या प्राण्यांबद्दल आहे. अशात ते कुणाचं 5-10 महिन्याचं बाळही असलं तरी. अशा भयंकर घटना घडत असताना आपण सगळे पाहतो की या पिल्लांप्रमाणे लहान मुलंही बोलू शकत नाही. त्या सगळ्यांनाच न्याय मिळायला हवा.'
हेही वाचा : सोनू सूदला आली होती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची ऑफर! 'या' भीतीमुळे दिला नकार
जया भट्टाचार्य यांच्याविषयी बोलायचं झालं तर टिव्ही इंडस्ट्रीमध्ये बराच काळ काम केल्यानंतर त्यांनी मोठा ब्रेक घेतला. कारण त्या स्टीरियोटाइम होऊन थकल्या होत्या. जया भट्टाचार्य या भटके कुत्रे आणि पिल्लांना वाचवण्यासाठी काम करतात. त्या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्राण्यांना वाचवण्याचा काय करतात ते दाखवताना दिसतात. या संबंधीत देखील एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. त्यानंतर एका नेटकऱ्यानं विचारलं की 'तो अपराधी कुठे आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'या श्वानाचं मोकळेपणानं फिरणं देखील आता सुरक्षित नाही. आज हे श्वानाचं पिल्लू आहे, नंतर माणासाचं बाळ असू शकतं.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'माणूस म्हणून लाज काठली आहे. देवा मला या पिल्लासाठी खूप वाईट वाटतंय. आशा आहे की त्याचं या पुढचं आयुष्य हे आनंदी जाओ.'