हात आणि बोटांमध्ये दिसणारी 'ही' लक्षणं म्हणजे तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलंय

High Cholseterol Symptoms on Hands and Feet: शरीरात उच्च कोलेस्टेरॉल वाढल्यास आपल्याला काही लक्षणं दिसात. तुम्हाला जर हात आणि बोटांमध्ये ही लक्षणं दिसल्यास डॉक्टरांना संपर्क साधावा.   

नेहा चौधरी | Updated: Jun 13, 2024, 03:01 PM IST
हात आणि बोटांमध्ये दिसणारी 'ही' लक्षणं म्हणजे तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलंय title=
Cholesterol Symptoms

High Cholseterol Symptoms on Hands and Feet: बदलेल्या काळाननुसार आजकाल जीवनशैली अतिशय बिघडलेली आहे. ताणतणाव आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हृदयविकारापासून ते स्ट्रोकपर्यंत अनेक समस्या लोकांना जाणवत आहे. साधी पचनक्रियाही तरुण पिढीची चांगली दिसून येत नाही. विशेष बाब म्हणजे कोलेस्टेरॉलची पातळी केवळ लठ्ठ लोकांमध्येच नाही तर बारीक लोकांमध्येही पाहिला मिळत आहे. अनेक वेळा शिरा पूर्णपणे बंद होईपर्यंत कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत जाते.

आरोग्य तज्ज्ञानुसार आपल्या शरीरात उच्च कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढल्यास त्याची लक्षण आपल्या दिसतात. मात्र आपण साधणार गोष्ट म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो. हात आणि बोटांमध्ये ही लक्षणं दिसून येतात. ही लक्षणं दिसल्यास तुमच्या शरीरात उच्च कोलेस्टेरॉलची पातळी वाढली आहे हे दिसून येते. उच्च कोलेस्ट्रॉलची लक्षणे हातांपासून नखांपर्यंत दिसून येतात. जाणून घ्या कोणती लक्षणं आहेत जी आपल्याला दिसतात आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. 

वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे नखे आणि हातांवर दिसतात 'ही' लक्षणं

नखे पिवळसर होणे

जर शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी वाढली तर तुमच्या नखांचा रंग पिवळा दिसून लागतो. हे शरीरातील खराब रक्त परिसंचरण असल्याचा दर्शवितो. हे शरीराच्या अनेक भागांमध्ये तुम्हाला पाहिला मिळतं. तुमच्या नखांचा रंग पिवळा होऊ लागतो, नाहीतर नखांना तडा जाऊ लागतो. इतकंच नाही तर तुमची नखंही वाढणं थांबतात. 

हेसुद्धा वाचा - दोनदा ब्रश केल्यावरही तोंडात दुर्गंधी येते का? तुम्ही 'या' 5 गंभीर आजारांच्या विळख्यात तर नाही ना?
 

हातात वेदना

जेव्हा शरीरात प्लेक जमा होतो तेव्हा ते रक्तवाहिन्यांना अवरोधित करते. ज्याला वैद्यकीय भाषेत एथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. शरीरात कोलेस्टेरॉल वाढलं तर हाताच्या रक्तवाहिन्यावर परिणाम होतो. त्यामुळे हात दुखू लागतात. अनेक वेळा ही वेदना खांदे आणि बोटांपर्यंत होते. 

हाताला कंप किंवा बधीरपणा

शरीराच्या काही भागांमध्ये रक्ताभिसरणात अडथळे निर्माण झाल्यामुळे हाताला थरकाप किंवा बधीरपणा जाणवायला लागतो. उच्च कोलेस्टेरॉल आणि लठ्ठपणा योग्य रक्तप्रवाह रोखतात. यामुळे हाताचा थरकाप होण्याची समस्या उद्भवू शकतं. अशावेळी या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)