नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाचे भगविकरण करण्याचे काम सध्या जोमात सुरू आहे. आदित्यनाथ यांच्या कार्यालयास रंगरंगोटी करण्यास सुरूवात करण्यात असून, मुख्यमंत्र्यांची केबीन, सोफे, खिडक्यांचे पडदे, कारपेट, भिंतींपासून ते टेबलांवरील अच्छादनांपर्यंत सर्व काही भगव्या आणि गर्द केशरी रंगात झळकण्यास सुरूवात झाली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कार्यलाय लाल बहादूर शास्त्री भवन येथे आहे. या परिसराला एनेक्सी म्हणून ओळखले जाते. आजवरच्या इतिहासात गेली अनेक वर्षे पांढऱ्या रंगात मोठ्या डौलात उभी असलेली ही इमारत योगींच्या कार्यकाळात रंग बदलत्या आवस्थेत दिसत आहे. भवनाबाहेरील भिंती भगव्या रंगांनी रंगल्या आहेत. इमारतीचे छत आणि आतील भागही अशाच पद्धतीने रंग बदलत्या आवस्थेत दिसत आहे.
योही आदित्यनाथ हे एनेक्सी इमारतीच्या पाचव्या मजल्यावर बसतात. योगींचे कार्यलयही भगव्या रंगात झळकत असून, केवळ केबिनच नव्हे तर, टेबल, खूर्ची, कारपेट आणि कपाटेही भगवी झाली आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, रंग बदलण्याच्या निर्णयाबाबत बोलताना योगेश शुक्ला या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, आमच्या समोर अनेक रंगाचे पर्याय होते. मात्र, त्यातून आम्ही केशरी रंगच निवडला. योगी सरकारच्या या रंगतदार निर्णयावर कॉंग्रेस प्रवक्ते अमरनाथ यांनी खोचक टिप्पणी केली आहे. अमरनाथ यांनी म्हटले आहे की, कोणताही रंग वाईट नसतो. मात्र, सरकारी खुर्च्या केशरी रंगाने रंगवने हे नोकरशाहीचे भगविकरण करण्यातला प्रकार आहे. दरम्यान, या रंगरंगोटीमुळे देशाच्या राजकारणात भलताच रंग भरला जाणार अशी चिन्हे आहेत.
दरम्यान, शिक्षण विभागानेही सरकारी प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना भगव्या रंगाच्या स्कूल बॅग वाटल्याचे वृत्त आहे.