१५५ वर्ष जुन्या 'या' ट्रेनचा आज शेवटचा प्रवास...

१ नोव्हेंबरपासून लोकल ट्रेनचे रूप पालटणार आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 31, 2017, 03:57 PM IST
१५५ वर्ष जुन्या 'या' ट्रेनचा आज शेवटचा प्रवास...  title=

नवी दिल्ली : १ नोव्हेंबरपासून ट्रेनचे रूप पालटणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने १५५ वर्ष जुन्या ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे निश्चित असे काही कारण नाही. जी ट्रेन १ नोव्हेंबरपासून बंद होणार आहे तिचे नाव 'श्रमिक ट्रेन' असे आहे.

ही ट्रेन  जमालपुर पासून कजरा आणि जमालपुर ते सुलतांगज दरम्यान चालवली जाते. आज या ट्रेनच्या प्रवासाचा शेवटचा दिवस आहे. हिंदी वेबसाईटमध्ये प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार मालदा डिवीजन या बड्या अधिकाऱ्याने या निर्णयाला दुजोरा दिला आहे. जमालपुरमध्ये आशियातील रेल्वेचा प्रसिद्ध कारखाना आहे. येथे डिझेल इंजिन तयार केले जाते. त्याची दुरुस्ती होते. हा कारखाना ८ फेब्रुवारी १८६२ मध्ये इंग्रजांनी सुरु केला.