मुंबई : भारतात व्यवसाय करणाऱ्या सोशल मीडिया कंपन्यांसाठी सरकारकडून काही प्रस्तावित नियम लागू केले गेल्यास भारतातील व्हॉट्सअपचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. भारतात व्हॉट्सअपचे २० करोड तर जगभरात जवळपास १.५ अब्ज वापरकर्ते आहेत. व्हॉस्टअपच्या प्रस्तावित नियमांमध्ये मेसेजेसचा शोध घेणे ही सर्वात मोठी समस्या असल्याचे व्हॉट्सअपचे प्रमुख कार्ल वूग यांनी सांगितले. फेसबुकची मालकी असलेले व्हॉट्सअप डिफॉल्ट स्वरूपात एन्ड-टू-एन्ड एनक्रिप्शनचा वापर करतो. याद्वारे केवळ संदेश पाठवणार आणि तो स्विकारणारच संदेश पाहू शकतो. हे संदेश व्हॉट्सअपलाही वाचता येत नसल्याचे व्हॉट्सअपच्या वरिष्ठांनी सांगितले आहे.
नवीन प्रस्तावित नियामांनुसार व्हॉट्सअपमध्ये गोपनियतेचे कोणतेही नियम देण्यात आलेले नाही. व्हॉट्सअप एन्ड-टू-एन्ड एनक्रिप्शनची सुविधा देतो. त्यामुळे व्हॉट्सअपद्वारे देण्यात येणारी संदेश सुविधा आता सध्याच्या नियमांनुसार देण्यात येणार नसल्याने आम्हला व्हॉट्सअपमध्ये बदल करावे लागणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
नवीन नियम लागू झाल्यानंतर भारतातून व्हॉट्सअप बंद होण्याची शक्यता वूग यांनी वर्तवली आहे. व्हॉट्सअपच्या एन्ड-टू-एन्ड एनक्रिप्शनद्वारे अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेणे कठीण जाते. परंतु सोशल मीडियासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारा नियमांतर्गत पुरवल्या जाणाऱ्या सेवांचा दुरूपयोग आणि हिंसा पसरवणाऱ्यांवर रोख लावण्यासाठी योग्य प्रक्रियेचे पालन करावे लागेल.