जेव्हा 'पुष्पा' बोर्डाची परीक्षा देतो, पेपरात उत्तराऐवजी काय लिहितो, पाहाच

पुष्पाचा प्रसिद्ध डायलॉग 'मैं झुकेगा नहीं...' सध्या चर्चेत आहे. आता रीलपासून वास्तवापर्यंत पोहोचलेल्या या चित्रपटाचा परिणाम 10वी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेवर दिसून आला आहे.

Updated: Apr 6, 2022, 12:32 PM IST
जेव्हा 'पुष्पा' बोर्डाची परीक्षा देतो, पेपरात उत्तराऐवजी काय लिहितो, पाहाच  title=

Pushpa Movie : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा' (Pushpa: The Rise) सिनेमा लोकांच्या चांगलास पसंतीस उतरला.  सोशल मीडियावर सिनेमाच्या गाण्यांवर आणि संवादांवर रील बनवण्याचा सपाटाच सुरु आहे. गाण्यावरची अल्लू अर्जुनच्या हुक स्टेप्सची (Hook Steps) तर भल्या भल्यांना हुरळ पडली. प्रत्येकजण या चित्रपटातील गाणी आणि संवादांवर रील बनवत आहेत. 'मैं झुकेगा नहीं...' (Mai Jhukega Nahi) हा डायलॉग तर बॉलीवूडपासून क्रिकेटरपर्यंत अनेकांच्या तोंडी दिसला. 

पण या चित्रपटाचा परिणाम आता रीलपासून वास्तवापर्यंत पोहचला आहे.  पश्चिम बंगाल माध्यमिक परीक्षेत (West Bengal Madhyamika Examination) असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दहावीच्या एका विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेवर 'मैं झुकेगा नहीं...' च्या धर्तीवर, चक्क 'पुष्पा... पुष्पराज अपुन लिखेगा नही...' असं लिहिलं आहे. 

संपूर्ण उत्तरपत्रिकेवर या विद्यार्थ्याने 'पुष्पा... पुष्पराज अपुन लिखेगा नही...' असं लिहून ठेवलं आहे. हा प्रकार पाहून पेपर तपासणी करणारे शिक्षकही अवाक झाले असून ही उत्तरपत्रिका सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. 

पश्चिम बंगालमध्ये दहावीच्या परीक्षा संपल्या असून सध्या पेपर तपासणीचं काम सुरु आहे.  एका शिक्षकाकडे हा पेपर तपासणीसाठी आला होता. दरम्यान, एका विद्यार्थ्याने आपल्या उत्तर पत्रिकेवर 'खेला होबे' असं लिहिलं आहे. 

ही उत्तरं मजेदार वाटत असली तरी उत्तरं न आल्याने असे डायलॉग लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांचं भविष्य काय असेल याबाबत शिक्षकांनी चिंता व्यक्त केली आहे. 

साऊथचे सिनेमे आता फक्त साऊथपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर त्यांची जादू इतर भाषांच्या लोकांवरही दिसू लागली आहे. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' चित्रपटाने साऊथसोबतच हिंदीतही चांगली कमाई केली आहे. या चित्रपटातील संवाद आणि गाण्यांचा सोशल मीडियावर बोलबाला आहे. या चित्रपटाने परदेशातही चांगली कमाई केली आहे. अनेक परदेशी लोकांनी त्याच्या डायलॉग्स आणि गाण्यांवर खूप व्हिडिओ बनवले आहेत.