नवी दिल्ली : वीज पूरवठा नसला तर अनेक काम रखडली जातात. मग ते सरकारी कार्यालय असो किंवा इतर कुठलं. पण आज आम्ही तुम्हाला असा एक व्हिडिओ दाखवणार आहोत जो पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल.
रुग्णालयात वीज नसल्याने अनेकदा सोनोग्राफी एक्स-रे काढताना थांबावे लागल्याचं आजपर्यंत तुम्ही पाहिलं किंवा ऐकलं असेल. पण एका रुग्णालयात वीज नसताना डॉक्टरांनी चक्क ऑपरेशन केलं आहे.
बिहार सरकारने दावा केलाय की, मुलभूत सुविधा नागरिकांना दिल्या जात आहेत. मात्र, हा दावा फोल ठरल्याचं दिसत आहे. बिहारमधील एका रुग्णालयात डॉक्टरांनी चक्क टॉर्चच्या सहाय्याने महिलेचं ऑपरेशन केलं आहे.
#WATCH: A woman is operated upon in torch light at Sadar Hospital in Saharsa as there was no electricity at that time in the hospital. #Bihar pic.twitter.com/HN6T5I2683
— ANI (@ANI) March 19, 2018
बिहारमधील सहरसा जिल्ह्यातील सदर रुग्णालयात ही घटना घडली आहे. रुग्णालयातील बत्ती गुल झाल्याने महिला रुग्णाच्या जीवाशी खेळत डॉक्टरांनी चक्क टॉर्चच्या सहाय्याने ऑपरेशन केलं. सध्या या पूर्ण प्रकरणावर प्रशासनातर्फे कुणीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.