'मुलाने घराबाहेर काढलं, पण तू स्वप्न पूर्ण केलंस', तरुणाने सुरक्षारक्षकाची अयोध्येला जाण्याची इच्छा केली पूर्ण, VIDEO व्हायरल

Viral Video: जेव्हा सुरक्षारक्षकाने सोशल मीडिया इन्फ्यूएन्सर भगतला आपलं अयोध्या राम मंदिराला भेट देण्याचं स्वप्न आहे सांगितलं, तेव्हा त्याने लगेच ते पूर्ण करण्याचं ठरवलं.   

शिवराज यादव | Updated: Jun 6, 2024, 08:20 PM IST
'मुलाने घराबाहेर काढलं, पण तू स्वप्न पूर्ण केलंस', तरुणाने सुरक्षारक्षकाची अयोध्येला जाण्याची इच्छा केली पूर्ण, VIDEO व्हायरल title=

Viral Video: अयोध्येत राम मंदिर उभं राहिल्यानंतर अनेकांनी तिथे जाऊन दर्शन घेण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं. पण अनेकांसाठी अद्यापही ते स्वप्नच असून, एक दिवस तरी ते पूर्ण होईल अशी आशा उराशी बाळगून आहेत. इंस्टाग्राम इन्फ्यूएन्सर अनिश भगत याला आपल्या इमारतीचे सुरक्षारक्षक ब्यास यांचंही हेच स्वर्न असल्याचं समजलं तेव्हा त्याने ते पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्याने ब्यास यांना न सांगता अयोध्येला जाण्याचा बेत आखला आणि आश्चर्याचा धक्का दिला. त्याने हा सगळा प्रवास त्याने कॅमेऱ्यात रेकॉर्ड करुन व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पाहिल्यावर तुमच्याही चेहऱ्यावर आनंदाची भावना उमटेल. 

रीलच्या सुरुवातीला अनिश ब्यास यांची ओळख करुन देतो. ते नेहमी हसतमुख आणि इतरांच्या मदतीसाठी तत्पर असतात असं तो सांगतो. यानंतर अनिश त्यांच्याशी संवाद साधतो. यावेळी त्याला ब्यास 65 वर्षांचे असून मुलाने त्यांना वाऱ्यावर सोडलं असल्याचं समजतं. आपल्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याने मुलगा सांभाळ करत नसल्याचं ते सांगतात. 

यानंतर अनिश त्यांना तुमची काय इच्छा आहे असं विचारतो. यावेळी ते आपली अयोध्या राम मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची इच्छा असल्याचं सांगतात. यानंतर अनिश त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं ठरवतो आणि त्याप्रमाणे विमानाचं तिकीट काढतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anish Bhagat (@anishbhagatt)

अनिश यानंतर ब्यास यांना आपण अयोध्येला जाणार असल्याचं सांगतो. हे ऐकल्यानंतर ब्यास यांनाही विश्वास बसत नाही. पण अनिश त्यांना हे खरं आहे सांगतो तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. यानंतर जेव्हा ते विमानात बसतात तेव्हा ब्यास सतत आपला मुलगा आणि त्याचं यश याबद्दल सांगत असतात.

अयोध्येला पोहोचल्यानंतर दोघेही उत्साही असतात आणि अखेर मंदिरात जाऊन दर्शन घेतात. व्हिडीओच्या शेवटी ब्यास मी तुझे आभार कसे मानू असे विचारतात. त्यावर अनिश त्यांनी गळाभेट द्या असं सांगतो. 

ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 2 मिलियनपेक्षा जास्त लोकांनी या पोस्टला लाईक आणि कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी अनिशने घेतलेल्या पुढाकाराचं कौतुक केलं आहे.