Viral Video: लग्न म्हटलं तर प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो. हा क्षण आपल्या कायम लक्षात राहावा यासाठी तो वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. म्हणून मग त्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. कोणत्याही जोडप्यासाठी लग्नात सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे फोटो. मग त्यासाठी वेगवेगळ्या कल्पना मांडत तो कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न असतो. दरम्यान, असंच एक भन्नाट फोटोशूट करणाऱ्या जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे.
सोशल मीडियावर लग्नात डान्स करणाऱ्या एका जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. edi_musaku या इन्स्टाग्राम आयडीवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत लग्न झालेलं जोडपं एकमेकांच्या मिठीत डान्स करत असतानाच आजुबाजूला आगीच्या ज्वाळा दिसू लागतात. पण आग लागलेली असतानाही जोडपं मात्र आपला डान्स सुरु ठेवतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओ लग्नासाठी हॉल सजलेला दिसत आहे. यावेळी नवविवाहित जोडपं एकमेकाला मिठी मारुन हॉलच्या मधोमध डान्स करत असतं. लग्नासाठी आलेले पाहुणेही त्यांचा हा डान्स पाहत आनंद लुटत असतात. याचवेळी दोघेजण येतात आणि जमिनीवर ज्वलनशील पदार्थ टाकतात आणि काही वेळाने आग लावतात. आग लागल्यानंतरही जोडपं मात्र डान्स करणं थांबवत नाही. उलट ते अजूनच तल्लीन होऊन डान्स करु लागतात.
ही आग लागणं हा प्लॅन होता. नवविवाहित दांपत्य आगीच्या मधोमध डान्स करण्याची ही योजना होती. आग लागते तेव्हा दांपत्याभोवती आगीच्या आकाराचं ह्रदय तयार होतं. या ह्रदयाच्या आत दांपत्या डान्स करत असल्याचं यावेळी दाखवण्यात आलं. त्यामुळेच आग लागली तेव्हा कोणालाही आश्चर्य वाटत नाही आणि सर्वजण पाहत उभे राहतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.