फतेहपूर : सिग्नलपासून ते हेल्मेटपर्यंत वाहतुकीचे नियम मोडणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एवढंच नाही तर अशी अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला पाहात असतो. मात्र सध्या सोशल मीडियावर रिक्षामध्ये कोंबून बसवलेल्या तरुणांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सध्या सोशल मीडियावर उत्तर प्रदेश पोलिसांनी शेअर केला व्हिडीओ पाहून तुम्हाला आर्श्चयाचा धक्काच बसेल. पोलिसांकडून वाहतूक नियमाचे पालन करण्यासाठी वारंवार सांगितलं जातं. तरी काही लोकं वाहतूक नियमाकडे सर्रास दुर्लक्ष करतात. उत्तर प्रदेशमधील वाहतूक पोलिसांनी एका ऑटो रिक्षा चालकाला वाहतूक नियमाचं उल्लंघन करताना पकडलं. रिक्षातला प्रकार पाहून पोलीसही चक्रावले. तर याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच युजर्सही अवाक झाले.
रिक्षातून पोलिसांनी जेव्हा प्रवाशांना बाहेर यायला सांगितलं, तेव्हा दोन तीन किंवा पाच नाही तर चक्क 27 लोक बाहेर आले. 27 लोक एकाच रिक्षात कसे बसले असतील असा प्रश्न आता तुम्हालाही पडलाच असेल. पण चक्क 27 लोक या रिक्षातून बाहेर आल्याचं पाहून पोलीस हैराण झाले.
#WATCH In this auto rickshaw of #Fatehpur, 27 people including the driver had gone to offer prayers for #Bakrid.
One by one the police counted twenty-seven people including children and brought them down.#UttarPradesh pic.twitter.com/CfjPotBsJ0
— KafirOphobia (@socialgreek1) July 10, 2022
व्हायरल झालेला हा व्हिडीओ उत्तरप्रदेशमधील फतेहपूर भागातील असल्याची माहिती मिळाली आहे. एखाद्या बॅगेत कपडे कोंबावे तसं अक्षरश: या रिक्षात चालकासोबत 27 प्रवासी कोंबले होते.
बिंदकी कोतवाली क्षेत्रात रिक्षा रस्त्यावरुन जात असताना तिचा वेग पाहता पोलिसांनी त्याला थांबवलं. प्रवाशांना ऑटो रिक्षा बाहेर येण्यास सांगितलं. या ऑटो रिक्षा लहान मुलांसोबत मोठे असं 27 लोकं होती. या ऑटो रिक्षा चालकावर पोलिसांनी कारवाई केली असून रिक्षा ताब्यात घेतली आहे.