नवी दिल्ली : भाजप खासदार वरूण गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून खासदारांच्या पगारवाढीला विरोध केलाय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
त्याशिवाय कोट्याधीश असलेल्या खासदारांनी तर पगारच घेऊ नये, अशी विनंतीही वरूण गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केलीय. सर्वच पक्षाचे खासदार पगारवाढीची मागणी करत असताना भाजपचे खासदार वरूण गांधी यांनी विरोध केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात.
सोळाव्या लोकसभेत ४४० खासदार हे कोट्यधीश आहेत. लोकसभेतील प्रति खासदारांची संपत्ती १४.६१ कोटी आहे. राज्यसभेतील प्रति खासदारांची संपत्ती २०.१२ कोटी आहे.