बळजबरीने KISS करणाऱ्या तरुणाला मुलीने दिली भयानक शिक्षा; रुग्णालयात करावं लागलं दाखल

Crime News : उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एका तरुणीने विनयभंग करणाऱ्या तरुणाला भयानक शिक्षा दिली आहे. शेतात काम करणाऱ्या तरुणीला पाहून आरोपीने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तरुणीने आरोपीला जन्माची अद्दल घडवली.

Updated: Feb 6, 2023, 02:21 PM IST
बळजबरीने KISS करणाऱ्या तरुणाला मुलीने दिली भयानक शिक्षा; रुग्णालयात करावं लागलं दाखल title=

Crime News : देशात महिलांवरील अत्याचारांच्या (violence against women) घटना सातत्याने समोर येत आहेत. काही महिला या अत्याचारांना  (Sexual assault) काही वेळानंतर वाचा फोडतात तर काही तिथल्या तिथेच विरोध करतात. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) घडलाय. उत्तर प्रदेशात मुलीच्या अब्रुवर हात टाकणे एका तरुणाला चांगलेच महागात पडलं आहे. अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला मुलीने आयुष्यभरासाठी चांगलीच अद्दल घडवली आहे. पोलिसांवर अत्याचार करणाऱ्या तरुणालाच रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मेरठ येथील दौराला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अझोंटा जंगलात शनिवारी दुपारी हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलगी शेतात काम करत असताना आरोपी तिथे पोहोचल. तिला एकटे पाहून आरोपीने बळजबरीने तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र धाडस दाखवत मुलीने त्याचा विरोध केला. चुंबन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या एका ओठांचा मुलीने दाताने जोरदार चावा घेतला. तरुणीने आरोपीच्या ओठांचा चावा इतक्या जोरात घेतला की त्याच्या तोंडापासून तो भाग वेगळा झाला. 

तरुणीच्या कृत्याने घाबरलेल्या आरोपीने जोर जोरात आरडा ओरडा सुरु केला. त्याच्या तोंडातून मोठा रक्तस्त्राव सुरु झाल्याने त्याचे कपडेही रक्ताने माखले. इतक्यात मुलीनेही आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. यानंतर जमा झालेल्या गावातील लोकांनी आरोपीला पकडून पोलिसांना बोलवले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याच्या ओठाचा तुकडा एका पिशवीत भरुन त्याला रुग्णालयात दाखल केले. आरोपीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुलीला एकटं पाहिलं अन्...

"ही मुलगी त्यांच्या शेतात काम करत होती. एक निर्जन जागा होती. आरोपी तरुणाने तिथे जाऊन तरुणीसोबत अश्लिल कृत्य करण्यास सुरुवात केली. आरोपीने मुलीचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलीने दाताने त्याच्या ओठाचा चावा घेतला. यानंतर पीडित तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणाला अटक करण्यात आली आहे. आरोपी तरुणावर उपचार सुरू आहेत," अशी माहिती दौराला पोलीस ठाण्याचे प्रभारी संजय शर्मा यांनी दिली.

मला खाली पाडलं आणि माझे कपडे...

"4 फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास मी माझ्या शेतात काम करत होतो. तेवढ्यात अचानक एक अनोळखी व्यक्ती माझ्या जवळ आला आणि त्याने मला मागून पकडले. यानंतर त्याने मला त्याच ठिकाणी शेतात खाली पाडून माझे कपडे फाडण्यास सुरुवात केली आणि माझ्या वर बसून माझ्या ओठांचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. मी माझा बचाव करताना दाताने त्याचे ओठ चावले. त्यानंतर त्याने माझे तोंड दाबले आणि आवाज करू नकोस, अन्यथा मी तुला मारून टाकेन असे सांगू लागला. त्यामुळेच मी जोरात आरडाओरडा केला आणि लगेचच जवळच्या शेतात काम करणारे लोक जमा झाले. त्यांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले, असे पीडित तरुणीने सांगितले.